२ वर्षाचा हा अभिनेता शशी कपूरला यांचा जीव वाचवण्यासाठी धावत गेला आणि...

शशी कपूर यांनी १९४४ मध्ये वडील पृथ्वीराज कपूर यांच्या 'शकुंतला' या नाटकातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. 

Updated: May 9, 2021, 07:22 PM IST
२ वर्षाचा हा अभिनेता शशी कपूरला यांचा जीव वाचवण्यासाठी धावत गेला आणि... title=

मुंबई : शशी कपूर यांच्या आठवणींचे काही मनोरंजक किस्से आहेत. यातील एका कथेत 2 वर्षाचा सैफ अली खान आहे. शशि कपूर सोबत शर्मिला टागोर पाप और पुण्य सिनेमाचं शूट करत होत्या.शशी कपूर यांचा शूटिंग दरम्यान व्हिलनसोबत एक फाईट सीन होता. पण दोन वर्षांचा सैफ अली खानला वाटलं की, विलन त्याच्या प्रेमळ शशी अंकलला मारत आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी तो धावत गेला.

शशी कपूर यांनी १९४४ मध्ये वडील पृथ्वीराज कपूर यांच्या 'शकुंतला' या नाटकातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती. बाल कलाकार म्हणून त्यांनी चित्रपटांतून अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलं. शशी कपूर बहुतेक अमिताभ बच्चन यांच्या भावाच्या भूमिकांमुळे लक्षात राहतात.

शाहरुख - सलमानच्या आधी 60-70 च्या दशकातील रोमँटिक स्टार होते तर ते शशी कपूर होते. त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक किस्से

एकदा शशी कपूर यांनी शूटच्या वेळी पूनम ढिल्लन यांना थप्पड मारली होती. शशी कपूर पूनमबरोबर त्रिशूलमध्ये काम करत होत्या. या चित्रपटाचं दिग्दर्शक यश चोप्रा होते. एका सीनमध्ये शशी कपूर यांनी पूनम ढिल्लन यांना थप्पड मारणार होते. एक्शन बोलतांच त्यांनी जोरात कानाखाली मारली. कारण शशी कपूर यांना वाटत होतं की, पूनम यांची प्रतिक्रिया खरी वाटावी अशी त्यांची इच्छा होती. यानंतर त्यांनी पूनमची यासाठी माफी मागितली.

सिंहापासून वाचवंल
दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री राखी यांनी सांगितलं की, एकदा त्या शशी कपूरबरोबर जानवर और इंसान नावाची फिल्म करत होत्या, ज्यामध्ये राखी यांना वाघापासून पळून जावं लागलं. आणि खड्ड्यात पडावं लागलं. पण त्या खड्ड्यात पडताच वाघानेही त्यांच्याकडे उडी मारली. लगेच शशी कपूर यांनी त्यांना खड्ड्यातून ओढलं.

अमिताभ बच्चन यांचा वाचवला जीव
कुलीच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन वाचले होते, दम्याच्या आजारामुळे अमिताभ बच्चन त्रस्त होते. एकदा त्यांना श्वास घेताना इतका त्रास होऊ लागला की, ते असा विचार करू लागले की, मी आता उडी मारतो, कदाचित उडी मारल्याने श्वास मी सदम्यात जाईन आणि श्वास घेता येईल. मात्र शशी कपूर यांनी बीग बींना असं करण्यास थांबवलं.

मेरे पास माँ है
शशी कपूर यांचा हा डायलॉग इतका प्रसिद्ध झाला की, ए.आर. रहमान यांनी आपला ऑस्कर घेताना या डायलॉगचा भाषणात उल्लेख केला.

मरता-मरता वाचले
शशी कपूर 'सुहाग' सिनेमाचं शूट करत होते. मनमोहन देसाई यांचा हेलिकॉप्टरचा क्लायमॅक्स सीन होता. शशी कपूर यांनी रॉड पकडताच त्याच्या थोड्या वेळानं हाताला घाम येऊ लागला आणि त्यांना लटकणं अवघड झालं परंतु ते मध्यभागीही शॉट कट करु शकले नाही. लांबून प्रत्येकाला असं वाटलं की, ते सीनमध्ये घुसले आहेत. मात्र त्यांचं लक्ष केवळ आपला जीव वाचविण्यावर होता.

दोनवेळा झाला होता एक्सिडंट
मनमोहन देसाईच्या सेटवर त्यांच्या सोबत बरेच हादसे घडले होते. शशी कपूर यांच्याबरोबर बरेच अपघात झाले. शेवटी शशी यांनी त्यांचे स्टंट करणं बंद केलं. एकदा देसाईंनी त्यांना काच फोडयचा सीन करायला सांगितला ज्या सीनला त्यांनी नकार दिला नंतर, सीन करणाऱ्या स्टंटमॅनला बारा टाके पडले

राज कपूर म्हणायचे टॅक्सी
एकेकाळी शशी कपूर ईतकं काम करायचे की, त्यांचे भाऊ राज कपूर त्यांना टॅक्सी म्हणू लागले. त्यांच्या यशामुळे त्यांच्या चाहता वर्ग खूप मोठा होता. ४ डिसेंबर २०१७ रोजी शशी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.