समुद्राच्या मधोमध बनलेली अदृष्य लक्ष्मणरेखा! मासे, प्राणी तर लांबच पक्षीसुद्धा ओलांडत नाहीत सीमा!

समुद्राच्या मधोमध अदृष्य लक्ष्मणरेखा बनलेली. निसर्गनिर्मीत असलेली ही या लक्ष्मणरेखेची सीमा रेषा मासे, प्राणी तर लांबच हवेत उडणारे पक्षी देखील चुकूनही ओलांडत नाहीत. जाणून घेऊया कुठे आहे ही सीमारेषा.

वनिता कांबळे | Updated: Jun 26, 2024, 07:21 PM IST
समुद्राच्या मधोमध बनलेली अदृष्य लक्ष्मणरेखा! मासे, प्राणी तर लांबच पक्षीसुद्धा ओलांडत नाहीत सीमा! title=

Wallace Line:  रामायणात लक्ष्मणरेखेचे उल्लेख आहे. वनवासात सीतीचे रक्षणासाठी लक्ष्मणरेखा आखण्यात आली. लक्ष्मणरेखा ओलांडल्या नंतरच सगळं रामायण घडलं. या पृथ्वीतलावर मात्र, एक अदृष्य लक्ष्मणरेखा बनलेली आहे. ही चमत्कारिक लक्ष्मणरेखा समुद्राच्या मधोमध बनलेली आहे. या लक्ष्णरेखेमुळे समुद्र दोन भागात विभागला गेला आहे. दोन्ही बाजूला राहणारे मासे, प्राणी तर लांबच पक्षीसुद्धा सीमारेषा ओलांडून दुसऱ्या हद्दीत जात नाहीत. जगात कुठे आहे ही लक्ष्मणरेखा जाणून घेऊया. 
समुद्राच्या मधोमध बनलेली अदृष्य लक्ष्मणरेखा दिसत नसली तरी तिचे अस्तित्व मात्र जाणवते. या लक्ष्मणरेखेमुळे समुद्र दोन भागात विभागला गेला आहे. दोन्ही भागातील जग वेगळे आहे. दोन्ही भागात वेगवेगळ्या प्रजातीचे मासे, प्राणी आणि पक्षी आहेत.

मात्र, येथील  मासे, प्राणी आणि पक्षी एकमेकांची सीमारेषा ओलांडून दुसऱ्या हद्दीत नाहीत. इंडोनेशियाच्या दोन बेटांमध्ये ही अदृष्य सीमारेषा बनलेली आहे. या सीमारेषेचे नाव वालेस लाइन (Wallace Line) असे आहे. इंडोनेशिया बाली (Bali) आणि लोम्बोक(Lombok) यांच्यामध्ये ही अदृष्य सीमारेषा बनलेली आहे.  या दोन बेटांमध्ये सुमारे 35 किलोमीटर अंतर असून मध्ये समुद्र आहे. 

वालेस लाइन मलय द्वीपसमूह (Malay Archipelago) आणि इंडो-ऑस्ट्रेलियाई द्वीपसमूह (indo-australian archipelago) या पृथ्वीवरील सर्वात मोठे द्वीपसमूह आहे.  पश्चिमेकडील जीवसृष्टी आशियाई आहे. येथे गेंडा, हत्ती, वाघ आणि वुडपेकरसारखे पक्षी आढळतात.  दुसऱ्या बाजूला यापैकी एकाही प्रजातीचा प्राणी दिसत नाही. दोन्ही भागात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पहायला मिळतता. येथील जीवसृष्टीचे पर्यावरणशास्त्र (ecology ) पूर्णपणे भिन्न आहे.

वालेस लाइन या अदृष्य सीमारेषेला वैज्ञानिक भाषेत  biogeographic boundary असे म्हंटले जाते. ही रेषा दिसत नसली तरी दोन्ही भागात दिसणाऱ्या प्राण्यांच्या विभिन्न प्रकारच्या प्रजातीवरुन दोन्ही भागातील विभिन्नता अधोरेखीत होते.  1859 मध्ये  ब्रिटीश निसर्गशास्त्रज्ञ अल्फ्रेड रसेल वॉलेस  (British naturalist Alfred Russel Wallace) यांनी ही सीमारेषा शोधली. अल्फ्रेड रसेल वॉलेस यांनीच चार्ल्स डार्विन  (Charles Darwin) यांचा Theory of Evolution चा सिद्धांत सिद्धांत स्वतंत्रपणे मांडला होता. वॉलेस मलय द्वीपसमूहात प्रवास करत असताना त्यांनी येथील सर्व बेटांना भेट दिली. यावेळी त्यांनी या दोन्ही भागातील प्राण्यांचे निरीक्षण करुन या अदृष्य सीमारेषेची ओळख जगाला करुन दिली. बालीचा परिसर पूर्वी आशियाचा भाग होता.

तर, लोंबक हा ऑस्ट्रेलियाचा भाग होता.  1960 च्या दशकात जेव्हा प्लेट टेक्टोनिक्स ओळखले गेले तेव्हा ऑस्ट्रेलियन प्लेट दक्षिणेकडील अंटार्क्टिकापासून दूर गेली. ही प्लेट हळूहळू उत्तरेकडे सरकल्यामुळे वॉलेस रेषा तयार झाली. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या प्रजाती एकमेकांच्या शेजारी असल्या तरी त्या पूर्णपणे एकमेकांपासून वेगळ्या असल्याचे सांगितले जाते.