मुंबई : 'हम दिल दे चूके सनम', 'देवदास', 'उमराव जान' अशा एकापेक्षा एक चित्रपटांच्या माध्यमातून प्रसिद्धझोतात आलेली अभिनेत्री ऐश्वर्या रायने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तिच्या सौंदर्याच्या चर्चातर कायम रंगत असतात. तर ऐश्वर्या सध्या एका धक्कादायक बातमीमुळे चर्चेत आली आहे. ही बातमी वाचून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. तर एका ३२ वर्षीय व्यक्तीने ऐश्वर्या माझी आई असल्याचा दावा केला आहे.
संगीत कुमार नामक एका व्यक्तीने ऐश्वर्या राय बच्चन माझी आई असल्याचा दावा केला आहे. संगीत कुमारचा जन्म १९८८ रोजी झाला आहे. तेव्हा ऐश्वर्या फक्त १५ वर्षांची होती. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तामुळे या बातमीचा खुलासा झाला आहे.
संगीतने दोन वर्षांपूर्वी सुद्धा अशापद्धतीने प्रसारमाध्यमांसमोर असा दावा केला होता. एका मुलाखतीमध्ये संगीत कुमारने 'ऐश्वर्या माझी आई आहे. माझा जन्म १९८८ साली आईव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे लंडनमध्ये झाला' असा दावा केला.
ही मुलाखत देखील दोन वर्षांपूर्वीची आहे. परंतु ही मुलाखत पुन्हा चर्चेचा विषय होत आहे. त्याचप्रमाणे लहानपणी आजी-आजोबांनी आपल्याला संभाळल्याचा दावाही त्याने केला आहे. 'ऐश्वर्याच्या आई-वडिलांनी मला दोन वर्ष सांभाळलं. त्यानंतर माझे वडील वेदीवेलू रेड्डी मला विशाखापट्टनमला घेऊन गेले.' असं तो म्हणाला.
तो एवढ्यावरचं थांबला नसून नातेवाईकांनी मी ऐश्वर्याचा मुलगा असल्याचे सर्व पुरावे नष्ट केले आहेत, असे देखील तो म्हणाला. तर आपण लवकरच आईसोबत राहण्यासाठी मुंबईत येणार असल्याचा दावा त्याने केला.