सलमान खानची पत्नी असल्याचा दावा करत घरात घुसली 'ही' मुलगी

सलमान खान हा बॉलिवूडचा दबंगस्टार आहे.

Updated: Mar 15, 2018, 02:56 PM IST
सलमान खानची पत्नी असल्याचा दावा करत घरात घुसली 'ही' मुलगी  title=

मुंबई : सलमान खान हा बॉलिवूडचा दबंगस्टार आहे.

आबलवृद्धांमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या काही सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे सलमान खान. सध्या अ‍ॅक्शन हिरोच्या भूमिका करत असला तरीही काही काळ सलमान 'प्रेम' या चॉकलेट हिरोच्या भूमिकेतही तितकाच लोकप्रिय आहे. त्यामुळे मुलींमध्ये सलमानची क्रेझही तितकीच आहे.  

एका मुलीने चक्क सलमान पती असल्याचा केला दावा 

सलमान खान हा बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. पण एका मुलीने चक्क त्याच्या घरात घुसून सलमान खान माझा पती असल्याचा दावा केला आहे. 

काय घडला प्रकार ? 

सलमान खानच्या वांद्रे येथील घरात एका मुलीने दुपारच्या वेळेस घुसण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान गॅलेक्सी अपार्टमेंटच्या गेटवर सुरक्षारक्षकाने त्या मुलीला हटकले. काही वेळाने शिफ्ट बदलल्यानंतर दुसरा सुरक्षारक्षक आला. त्याची नजर चुकवून मुलगी सलमान खानच्या घरापर्यंत पोहचली.  

सलमानच्या घरी असलेल्या आचार्‍याने दरवाजा उघडला तेव्हा या मुलीने मी सलमानची पत्नी असल्याचा दावा करत आरडाओरड करायला सुरूवात केली.  

आत्महत्येची धमकी  

सलमान खानच्या या चाहतीला पुन्हा हटकल्यानंतर तिने आत्महत्येची धमकी दिली. थोड्या वेळाने फायर ब्रिगेडने हस्तक्षेप करून तिला सलमानच्या घरातून बाहेर काढले.  

सलमान खान परदेशात 

सध्या सलमान खान आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सध्या अबुधाबीमध्ये आहे. लवकरच त्याचा 'रेस 3' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. सोबतच टेलिव्हिजनवरही 'दस का दम' हा रिएलिटी शो पुन्हा रंगणार आहे.