मुंबई : आज भारतीय सिनेसृष्टीचे जनक चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची जयंती आहे. मात्र दादासाहेब फाळके जयंती कार्यक्रमामध्ये गोंधळ झाला आहे.
अभिनेते आदेश बांदेकर आणि विजु खोटे यांच्यात वादावादी झाली आहे. या कार्यक्रमामध्ये आदेश बांदेकरांनी कार्यक्रम उरकला मग प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित का केले ? असा सवाल विजू खोटेंनी उपस्थित केला आणि या कार्यक्रमातून काढता पाय घेतला.