बिग बॉस मराठी : दुसर्‍या आठवड्यात विनीत बोंडे घराबाहेर

देशा परदेशात अनेक सीझन गाजवल्यानंतर आता बिग बॉसचं मराठी भाषेतील पहिलं पर्व सुरू झालं आहे. 

Dipali Nevarekar | Updated: Apr 30, 2018, 09:05 AM IST
बिग बॉस मराठी : दुसर्‍या आठवड्यात विनीत बोंडे घराबाहेर  title=

 मुंबई : देशा परदेशात अनेक सीझन गाजवल्यानंतर आता बिग बॉसचं मराठी भाषेतील पहिलं पर्व सुरू झालं आहे. बिग बॉसच्या पहिल्या मराठी पर्वामध्ये 14 स्पर्धकांमध्ये खेळ रंगायला सुरूवात झाली आहे. या विकेंडला बिग बॉसच्या घरातून दुसरे एलिमेशन झाले आहे.  

 विनीत बोंडे घराबाहेर  

 रविवारच्या विकेंडचा डाव या भागामध्ये मागील आठवड्यात बिग बॉसच्या घरात 'खूर्चीसम्राट' हे टास्क रंगलं होते. या टास्कदरम्यान घरातील वातावरण चांगलंच तापलं होतं. बिग बॉसच्या घरातील सदस्यांचा आणि त्यांच्या वागणुकीचा जाब  होस्ट महेश मांजरेकरांनी त्यांच्या खास शैलीमध्ये मागितला.  
 
 बिग बॉसच्या घरातील दुसर्‍या आठ्वड्यात अभिनेता विनीत बोंडे आऊट झाला आहे.  विनीतसोबत नॉमिनेशनमध्ये रेशम टिपणीस, जुई गडकरी, स्मिता गोंदकर,पुष्कर जोग, अनिल थत्ते हे स्पर्धक होते. घरात सार्‍यांची करमणूक करण्यामध्ये अव्वल असलेल्या विनीत बोंडेला घरातून बाहेर पडल्यानंतर एका व्यक्तीला पुढील आठवड्यासाठी नॉमिनेट करण्याची खास पॉवर मिळाली होती. त्यानुसार विनीतने अनिल थत्तेंना नॉमिनेट केलं आहे.   

 मेघा थाडे कॅप्टन   

 यंदाच्या आठवड्यात मेघा थाडे ही कॅप्टन झाली आहे. कॅप्टनपदाच्या शर्यतीमध्ये मेघासोबत सई लोकूर, रेशम टिपणीस शर्यतीमध्ये होत्या.

 बिग बॉसच्या घरात 15 कलाकार  

बिग बॉसच्या घरामध्ये राजेश शृंगारपुरे, अस्ताद काळे, रेशम टिपणीस, विनीत बोंडे, मेघा थाडे, उषा नाडकर्णी, आरती सोळंकी, भूषण कडू, ऋतुजा धर्माधिकारी, स्मिता गोंदकर, सई लोकूर, सुशांत शेलार, जुई गडकरी,पुष्कर जोग हे कलाकार आणि पत्रकार अनिल थत्ते हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.