Aai Kuthe Kai Karte : बेघर झालेल्या अरूंधतीला आशुतोषचा सहारा, मोठं स्वप्न साकारणार

आशुतोष अरूंधतीच्या कठीण काळात साथ देणार का? 

Updated: Feb 26, 2022, 03:01 PM IST
Aai Kuthe Kai Karte : बेघर झालेल्या अरूंधतीला आशुतोषचा सहारा, मोठं स्वप्न साकारणार  title=

मुंबई : स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' मालिकेने नवं वळण घेतलं आहे. आप्पांनी अरूंधतीला दिलेला घराचा अर्धा हिस्सा संजना आणि कांचन मागून घेतात. 

अरूंधती ही देखील अतिशय शांतपणे त्यांनी दिलेल्या पेपरवर सही करते. अरूंधती समृद्धी बंगला सोडते. अरूंधतीला आपल्या आईच्या घरी डोंबिवली येथे देखील फार काळ राहणं पटत नाही. त्यामुळे आता ती ऑफिस शेजारी घर घेण्याचा विचार करते. (Aai Kuthe Kai Karte : 'या' अभिनेत्रीने सोडली मालिका, नव्या मालिकेत दिसणार)

आशुतोष आणि नितीन तिला कंपनीचा तीन बीएचकेचं घर राहण्यासाठी देऊ करतात. मात्र अरूंधती ते घर नाकारते. आपण एकटं स्वतंत्र खोलीत राहू असं म्हणते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

यानंतर अरूंधतीचा भाड्याचं घर शोधण्याची मोहिम सुरू होते. परंतु घटस्फोटीत स्त्रीला घरं मिळणं तितकं सोपं नसतं. एकवेळ पती नसलेल्या महिलेला घर मिळेल. मात्र घटस्फोटीत स्त्रीला घर मिळणं कठीण आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आता अरूंधतीच्या डोक्यावर कोणतंच छप्पर नाही. अशावेळी आशुतोष अरूंधतीसोबत घरं शोधण्यासाठी बाहेर पडतो. आता अरूंधतीला तिच्या हक्काचं घर मिळणार का?