'भावानं ट्रॅक्टर घेतलाय...'; 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

Ashvini Mahangade Tracker Video: अभिनेते आणि अभिनेत्री या महागड्या गाड्या घेताना आपण पाहतो त्यामुळे त्यांची विशेष चर्चाही रंगलेली असते. परंतु सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या भावानं ट्रॅक्टर विकत घेतला आहे. ज्याची जोरात चर्चाही सुरू झाली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 16, 2023, 08:37 PM IST
'भावानं ट्रॅक्टर घेतलाय...'; 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल title=
aai kuthe kay karte fame actress ashvini mahangade brother buyes tractor

Ashvini Mahangade Tracker Video: सध्या एका अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे. सेलिब्रेटी हे महागड्या कार्स घेताना दिसतात. परंतु सध्या एका अभिनेत्रीच्या पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधले आहे. यावेळी तिच्या भावानं लक्झरीयस कार नाही तर चक्क ट्रॅक्टर विकत घेतला आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेतील ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची बरीच चर्चा रंगलेली आहे.

अश्विनी महांगडे या अभिनेत्रीची बरीच चर्चा रंगलेली असते. तीही सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओज शेअर करताना दिसते. त्यामुळे तिचीही अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या तिनं शेअर केलेल्या पोस्टची सर्वत्र चांगलीच चर्चा आहे. यावेळी तिच्या भावानं लाल रंगांचा ट्रॅक्टर विकत घेतला आहे. 

यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''स्वराज्य…. भावाने ट्रॅक्टर घेतला….. नाना….आम्ही स्वराज्य #वाढवू आणि #टिकवू सुद्धा…'' यापुढे तिनं #बद्री, #bro_sis, #आनंदाची व्याख्या हीच की भाऊ प्रगती करतोय असे हॅशटॅग्सही दिलं आहे. यावेळी या ट्रॅ्कची तिनं पूजाही केली आहे. सोबतच तिनं हा ट्रॅक्टर चालवूनही दाखवला आहे. तिचा भाऊ बद्रीनाथ महागडे यानं हा ट्रॅक्टर विकत घेतला आहे. यावेळी दिवाळी पाडव्याचं औचित्य साधून त्यानं हा ट्रॅक्टर घेतला आहे ज्याची पोस्ट तिनं शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर सगळेच नाना तऱ्हेची प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावेळी अनेक मराठी सेलिब्रेटींनीही तिच्या या पोस्टवर कमेंट् केली आहे. 

हेही वाचा : 'व्यक्तिपूजेची कीड...', प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकाची लक्षवेधी पोस्ट

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

\

यावेळी ट्रॅक्टर घेतल्यानं सर्वत्र तिचे कौतुकही होताना दिसते आहे. अश्विनी ही लोकप्रिय टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे. झी मराठी वाहिनीवरील अस्मिता या मालिकेतूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आई कुठे काय करते या मालिकेतही ती महत्त्वाची भुमिका निभावते आहे. अनघा ही तिची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय आहे.