Aai Kuthe Kay Karte : अरूंधतीच्या आयुष्यात मित्राची एन्ट्री, कसं असणार दोघांचं नातं?

मालिकेला मिळणार नवं वळण 

Updated: Oct 27, 2021, 01:29 PM IST
Aai Kuthe Kay Karte : अरूंधतीच्या आयुष्यात मित्राची एन्ट्री, कसं असणार दोघांचं नातं?

मुंबई : 'आई कुठे काय करते' या मालिकेत लवकरच नवं वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत लवकरच आई म्हणजे अरूंधतीच्या मित्राची एन्ट्री होणार आहे. अरूंधतीचा मित्र ही संकल्पनाच मुळात देशमुख कुटुंबियांसाठी नवीन आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार? याकडे प्रेक्षकांच लक्ष लागून राहिलं आहे. 

अरूंधितीचा मित्र म्हणून अभिनेता समीर धर्माधिकारी मालिकेत दिसणार आहे. या मित्रासोबत अरूंधतीचं नातं कसं असणार आहे? याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. अरूंधतीचा हा मित्र दिला साथ देईल की आणखी कोणत्या संकटात टाकेल? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. समीर धर्माधिकारी अरूंधतीच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. 

अरूंधती आता एका आश्रमात काम करत आहे. आश्रमातील ट्रस्टी एकदा आश्रमला भेट देतात. त्यावेळी अरूंधतीचं गाणं त्यांच्या कानी पडतं. ही कोण? असा सवाल त्या तेथील संचालिकेला विचारतात. तेव्हा अरूंधती जोगळेकर असं नाव ऐकताच ट्रस्टी विचारात पडतात. अरूंधतीच्या माहेरच्या नावाचा संंबंध याच्याशी काही आहे का? याबाबत सगळयांना उत्सुकता आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अरूंधती सध्या अविनाशला पैसे देऊन चांगली फसली आहे. यावेळी अनिरूद्ध, संजनासोबतच आई आणि अभि देखील तिच्या विरोधात असताना दिसतात. अरूंधतीचा सगळ्यांना मदत करण्याचा स्वभाव तिच्याच अंगाशी येईल का? असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. अविनाश पैसे घेऊन पळून गेला तर? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात देखील आला आहे.