Why Rohit Sharma Said Tum Log Marwa Doge Mujhe: ब्रिस्बेनमधील बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेमधील भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची तिसरी कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली. या कसोटीनंतर पत्रकार परिषदेमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मावर प्रश्नांचा भडिमार झाल्याचं पाहायला मिळालं. रोहित शर्माला अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र या सर्व प्रश्नांची त्याने अगदी शांततेत उत्तरं देण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये रोहितबरोबर रविचंद्रन अश्विनही सहभागी झाला होता. अश्विनने याच पत्रकार परिषदेमध्ये अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्माला अनेक पत्रकारांनी अश्विनसंदर्भातही प्रश्न विचारले. एका पत्रकाराने चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन या तिघांवर काही वेगळी जबाबदारी सोपवली जाणार का अशा अर्थाचा प्रश्न अचानक रोहितला विचारला. "पुजारा, राहणे आणि अश्विन वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळतील का?" असा प्रश्न पत्रकाराने विचारले.
रोहितने हा प्रश्न ऐकताच दिलेलं उत्तर ऐकून पत्रकार परिषद आयोजित केलेल्या छोटेखानी हॉलमध्ये एकच हशा पिकला. रोहित शर्माने अश्विन वगळता ज्या इतर दोन क्रिकेटपटूंची नावं पत्रकाराने घेतली ते अजूनही सक्रीय असल्याची आठवण करुन देताना ते कसोटी टीममध्ये पुनरागमन करु शकतात, असंही सूचित केली.
‘अरे भाई खाली अश्विनने रिटायरमेंट का ऐलान किया है. तुम लोग मरवा दोगे मुझे. रहाणे-पुजारा दोनों अभी खेल रहे हैं. अच्छा खेलेंगे तो टीम में आ सकते हैं,’ असं रोहित या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. रोहितने अगदी फ्रेण्डली होत दिलेलं हे उत्तर ऐकून सारेच पत्रकार हसू लागली. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
Rohit Sharma at the post-match conference of Gabba Test being at his witty self when asked about the future of Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara, after Ravichandran Ashwin announced retirement from international cricket. pic.twitter.com/KcOTBXO3Hm
— चिरकुट ज़िंदगी (@Chirayu_Jain26) December 18, 2024
विशेष म्हणजे पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे दोघे बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा भाग नाहीत. या मालिकेसाठी पुजारा कॉमेंट्री पॅनलमध्ये आहे तर दुसरीकडे अजिंक्य रहाणे सय्यत मुश्ताक अली ट्रॉफी 2024 स्पर्धेत सहभागी झाला आहे. हे दोघेही मधल्या फळीतील भरवाशाच्या फलंदाज असून दोघांनाही अनेकदा संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे. या दोघांना बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेतून वगळण्यात आल्याने त्यांचं भारतीय क्रिकेटमधील भविष्य काय असेल याबद्दल बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.
बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेतील तीन कसोटी सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकला असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. आता भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पात्र होण्यासाठी इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे.