Gold Price Today: 'या' एका निर्णयामुळं सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

Gold Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. काय आहेत दर जाणून घेऊया. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 19, 2024, 11:23 AM IST
Gold Price Today: 'या' एका निर्णयामुळं सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या  आजचा भाव title=
gold price today on 19th December gold silver rate down trading on mcx 22kt 24kt gold rates

Gold Rate Today: कमोडिटी बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे भाव कोसळले आहेत. तर, चांदीच्या दरातही 2243 रुपयांनी घसरून 88,137 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. कालच्या क्लोजिंग भावापेक्षा 2.48 टक्क्यांनी घसरली आहे. काल चांदी 2.48 टक्क्याने घसरली होती. एका बातमीमुळं सोन्या-चांदीच्या दरात चांगलीच घट झाली आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया. 

अमेरिकी फेडरल रिझर्व्ह बँकेकडून बुधवारी व्याज दरात कपात करण्यात आली आहे. व्याजदरात 0.25 टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली आहे. आउटलूक कमोजर झाल्याने मौल्यवान धातुच्या दरात घसरण झाली आहे. फेडच्या निर्णयामुळे डॉलर निर्देशांक एक टक्क्याने वाढून दोन वर्षांत प्रथमच 108 वर पोहोचला आणि 10 वर्षांच्या यूएस बॉण्ड उत्पन्नाने साडेचार टक्क्यांच्या वर सात महिन्यांच्या उच्चांकावर झेप घेतली. फेडच्या निर्णयामुळे सोन्याचा भाव 60 डॉलरपर्यंत घसरला आणि चांदी 3.5 टक्क्यांनी घसरून 30 डॉलरच्या खाली आली. त्यामुळे आज देशांतर्गत वायदे बाजारात घसरण दिसून आली.

सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात 710 रुपयांची घसरण झाली असून आज प्रतितोळा भाव 77,130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोन्याचे भाव 70,700 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 530 रुपयांनी घसरून 57,850 रुपयांवर पोहोचले आहेत. तीन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी चांदीचा भाव 500 रुपयांनी वाढून 92,000 रुपये किलो झाला. मंगळवारी तो 91,500 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांत चांदीचा भाव किलोमागे साडेपाच हजार रुपयांनी घसरला आहे.

आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  70,700 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77,130 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  57,850 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,070 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,713 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 785 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   56,560 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   61,704 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    57,850 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 70,700 रुपये
24 कॅरेट  77,130 रुपये
18 कॅरेट- 57,850 रुपये