Aamir Khan घटस्फोटानंतर 28 एप्रिलला करणार मोठी घोषणा...

आमिरच्या 'त्या' व्हिडीओनंतर प्रत्येक जण 28 एप्रिलच्या प्रतीक्षेत.... घटस्फोटानंतर अभिनेता करणार मोठी घोषणा  

Updated: Apr 25, 2022, 08:55 AM IST
Aamir Khan घटस्फोटानंतर 28 एप्रिलला करणार मोठी घोषणा...  title=

मुंबई : अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. त्यामुळे अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी चाहते प्रतीक्षेत आहेत. आमिर लवकरचं 'लाल सिंग चड्ढा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे सिनेमाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचदरम्यान आमिर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये आमिर क्रिकेट खेळताना दिसत. बॅटिंग करताना आमिर म्हणतो, '28 एप्रिलला तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A

त्यामुळे आता आमिर 28 एप्रिलला कोणत्या गोष्टीची घोषणा करणार याकडे अनेकांचं लक्ष आहे. आमिरच्या या वक्तव्यानंतर युजर्स वेगवेगळ्या गोष्टींचा अंदाज लावत आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना 28 एप्रिल पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

लाल सिंग चड्ढा सिनेमाबद्दल सांगायचं झालं,  तर टॉम हँक्स स्टारर 'फॉरेस्ट' गंपचा रिमेक आहे. या सिनेमाच दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. या सिनेमात आमिरसोबत करीना कपूर खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

सिनेमाची तारीख दोनदा पुढे ढकलण्यात आली आहे. 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट 12 ऑगस्टला सिनेमागृहात दाखल होणार आहे. सिनेमाद्वारे आमिर चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे.