Ira Khan च्या बॉयफ्रेंडचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, सगळीकडे याचीच चर्चा

नुपुरसोबतचे बोल्ड फोटो शूट 

Updated: Jan 4, 2022, 09:16 AM IST
Ira Khan च्या बॉयफ्रेंडचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, सगळीकडे याचीच चर्चा  title=

मुंबई : आमिर खान (Aamir Khan) ची मुलगी आयरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. आयरा आपल्या खासगी जीवनातील सगळ्या गोष्टी इंस्टाग्रामवर शेअर करत असते. हल्लीच तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचे म्हणजे नुपुर शिखरे (Nupur Shikhare) सोबतच अतिशय खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या फोटोत नुपुर आपल्या नव्या बदलात दिसत आहे. 

नुपुर आणि आयराचं नातं 

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आयराची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आयरा तिच्या लव्ह लाईफबद्दलही खूप चर्चेत आहे आणि तिने हे कोणापासून लपवलेले नाही. अनेकदा आयरा नुपुरसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. 

आयरा खान नुपूर शिखरेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि अनेकदा सोशल मीडियावर तिच्यावरील प्रेम व्यक्त करते. दरम्यान, आयराने नुपूर शिकरेच्या शरीरातील बदलाचा फोटो शेअर केला आहे. जो वेगाने व्हायरल होत आहे.

आयराची इंस्टा स्टोरी 

आयराने काही वेळापूर्वीच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नुपूरची इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. दुसरीकडे, नुपूरच्या पोस्टबद्दल बोलायचे झाले तर, त्यात दोन फोटोंचा कोलाज आहे. दोन्ही चित्रांमध्ये एका महिन्याचा फरक आहे, जिथे नुपूरचे शारीरिक परिवर्तन दिसत आहे. सोशल मीडिया यूजर्स या पोस्टला लाइक करत आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये खूप कौतुक करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

नुपुरची पोस्ट 

ही पोस्ट शेअर करत नुपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'उपवास करण्यापूर्वी आणि उपवासानंतर योग्य अन्न. दोन्ही चित्रांमध्ये जवळपास महिनाभराचा फरक आहे. नुपूर एक फिटनेस कोच आहे आणि अनेकदा तिच्या फिटनेसशी संबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी एका फोटोमध्ये तो बायसेप्स फ्लॉंट करताना दिसला होता.