close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आमीर खानचा टीकाकारांना ठेंगा

काय म्हणाला आमीर... 

आमीर खानचा टीकाकारांना ठेंगा

मुंबई : नुकताच प्रदर्शित झालेला आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे. सिनेमाघरात प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. ठग्स... या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. 

पहिल्याच दिवशी या सिनेमाने 52.25 करोड रुपयांची कमाई केली असून एक नवा रेकॉर्ड रचला आहे. जर हिंदी सिनेमांचा रेकॉर्ड पाहिला तर या मागचा रेकॉर्ड हा 39.32 करोड रुपये कमाईसोबत सलमान खानच्या प्रेम रतन धन पायो या सिनेमाने रचला आहे. जर बाहुबली या सिनेमाला या यादीत समाविष्ट केलं तर या सिनेमाने 40.73 चा आकडा गाठला आहे.

संजू या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमाची रविवारी कमाई ठग्स ऑफ हिंदुस्तान या सिनेमासोबत तोलली तर आमीरच्या सिनेमाने नवा इतिहास रचला आहे. या सिनेमाने दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मल्टीप्लेक्समध्ये धुमाकूळ घातला आहे. तसेच या परिसरातील सिंगल स्क्रिनवर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. 

बॉक्स ऑफिस कलेक्शन बघता आमीर खान म्हणतो की, ठग्स ऑफ हिंदुस्तान या सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन बघून मी भारावून गेलो आहे. इतर प्रेम रसिकांकडून मिळतंय त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.