आगामी चित्रपटात आमिर खान करत असलेल्या 'या' भूमिकेमुळे रंगला वाद

अभिनेता आमिर खान हा बॉलिवूडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जातो. 

Updated: Mar 22, 2018, 04:43 PM IST
आगामी चित्रपटात आमिर खान करत असलेल्या 'या' भूमिकेमुळे रंगला वाद

मुंबई : अभिनेता आमिर खान हा बॉलिवूडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जातो. काही ठराविक सिनेमे आमिर खान करतो. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्यांच  दर्जेदार काम पाहता येते. लवकरच 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटामध्ये आमिर खान आणि अमिताभ बच्चन झळकणार आहेत. आमिर आणि अमिताभ ही जोडी पहिल्यांदा हिंदी रूपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. या चित्रपटानंतर आमिर खान 'महाभारत' चित्रपटामध्ये झळकणार आहे.  

नव्या चित्रपटावरून रंगलं महाभारत 

आगामी महाभारत चित्रपटामध्ये आमिर श्रीकृष्णाची भूमिका साकारणार आहे.  आमिर श्रीकृष्णाची भूमिका साकारत असल्याने नवा वाद रंगला आहे. 'महाभारत' हा आतापर्यंतचा सगळ्यात महाग चित्रपट ठरणार आहे. 

फ्रेंच पॉलिटिकल रायटरच्या ट्विटमुळे वाद  

 

फ्रेंकॉईस गॉतियर या लेखकाने केलेल्या ट्विटनुसार, ' आमिर खान हा मुसलमान आहे. त्याला हिंदू महाकाव्यातील इतकी महत्त्वाची भूमिका करण्याची संधी कशी मिळेल? त्यानंतर मुसलमान हिंदूंना 'मोहम्मद'चा रोल करण्याची संधी देणार काय ? या ट्विटमध्ये फ्रेंकाईसने मोदी सरकारवरही प्रश्न उठावले आहेत.  

आमिर खानचे चाहते आले पुढे 

फ्रेंकॉईसच्या या ट्विटनंतर आमिर खानचे चाहते त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत. गीतलेखक जावेद अख्तरांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया लिहली आहे. जावेद अख्तरांनी लिहलेल्या ट्विटनुसार, तुम्ही पीटर ब्रुक्सच्या प्रोडक्शनची 'महाभारत' पाहिली आहे का ? मला जाणून घ्यायला आवडेल की देशात अशाप्रकारच्या गोष्टी पसरवण्यासाठी तुम्हांला कोणत्या विदेशी कंपनीकडून पैसे मिळतात? 

 

फ्रेंकॉईसचे प्रत्युत्तर  

 

फ्रेंकॉईसने पुन्हा उत्तर देऊन याबाबतचे उत्तर दिले. महाभारत चित्रपटामध्ये आमिर श्रीकृष्णाची भूमिका करणार हे सांगितल्यानंतर अनेक हिंदूंनी मला ट्रोल केलं. त्या हिंदूंना लाज वाटायला हवी. 

1000 कोटींचं बजेट 

आगामी 'महाभारत' या चित्रपटाचं बजेट 1000 कोटींचं आहे. फिल्म विशेषज्ञ रमेश बाला यांनी या चित्रपटाबाबत ट्विट केलं आहे. 'महाभारत' हा चित्रपट ब्लॉकबस्टर सिनेमा 'बाहुबली'चा रेकॉर्ड मोडण्याची क्षमता आहे.