'पूर्ण दारुची बॉटल संपवायचो...' नशा करण्यावर हे काय बोलला होता आमिर खान

अभिनेता आमिर खान आज 14 मार्चला त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता त्याच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. सध्या अभिनेता त्याचा आगामी सिनेमा ‘सितारे जमीन पर’ मुळे चर्चेत आहेत.

Updated: Mar 14, 2024, 03:32 PM IST
'पूर्ण दारुची बॉटल संपवायचो...' नशा करण्यावर हे काय बोलला होता आमिर खान title=

Happy Birthday Aamir Khan : अभिनेता आमिर खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी पर्सनल तर कधी प्रोफेशनल लाईफमुळे आमिर खान कायमच चर्चेत असतो. सोशल मीडियावर आमिरची नेहमीच चर्चा असते. अभिनेत्याचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. 

अभिनेता आमिर खान आज 14 मार्चला त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता त्याच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. सध्या अभिनेता त्याचा आगामी सिनेमा ‘सितारे जमीन पर’ मुळे चर्चेत आहे. हा सिनेमा येत्या डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिर खानची इंडस्ट्रीत एक सज्जन व्यक्ती अशी प्रतिमा आहे. आमिर एक हसतमुख आणि साधारण जीवन जगणारा व्यक्ती आहे त्याला जास्त पार्टीही करायला आवडत नाही. ना तो दारु पित. मात्र जरी अभिनेता आता दारु पित नसला तरी असं नाही की, त्याने कधीच दारु प्यायली नाही. एकवेळ अशी होती जेव्हा तो पुर्णच्या पुर्ण दारुची बॉटल प्यायचा. 

आमिर खानने स्वत: काही वर्षांपुर्वी याबाबत एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला होता. याविषयी बोलताना अभिनेत्याने सांगितलं की, असं नाही की, मी कायमच दारुपासून लांब राहिलो आहे. मी कधी कधी खास प्रसंगी दारु प्यायचो आणि त्यावेळी एक दोन ग्लास नाही तर अख्खी बॉटल संपवायचो. मात्र आमिर असंही म्हणला की, तो कधी-कधीच दारु प्यायचा. जसं इतर काही लोकं एक किंवा दोन पेग प्यायल्यानंतर थांबतात, तो कधीही तसा थांबला नाही. जरी तो रोज दारू पीत नसला तरीपण जेव्हा केव्हा तो दारु प्यायचा तेव्हा तो संपूर्ण बाटली संपवायचा. एकदा त्याने दारूच्या नशेत एक कार्यक्रमही होस्ट केला होता.

आमिर खानचा स्टार प्लसवर एक शो होता. ज्याचं नाव सत्यमेव जयते असं होतं. आमिरने सांगितलं की, एकदा त्याने  दारू पिऊन या शोचा एक एपिसोड होस्ट केला होता. मात्र या गोष्टीचा त्याला खूप पश्चाताप झाल्याचंही अभिनेता म्हणाला.  सध्या अभिननेता त्याचा आगामी सिनेमा  'सीतारे जमीन पर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यावेळी अभिनेता त्याचा वाढदिवस सिनेमाच्या सेटवर साजरा करणार आहे.
 याचबरोबर आमिर खान सध्या त्याच्या 'लापता लेडीज' या चित्रपटासाठी देखील चर्चेत आहे, जो सध्या चित्रपटगृहांमध्ये चांगला गाजत आहे.