आराध्या बच्चनचा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक, कारण...

बच्चन कुटुंबातील कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.

Updated: Jan 9, 2022, 01:05 PM IST
आराध्या बच्चनचा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक, कारण... title=

मुंबई : बच्चन कुटुंबातील कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मग ती ऐश्वर्या राय असो, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन असो किंवा जया बच्चन. कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा व्हिडिओ येताच व्हायरल होतोच. मात्र, यावेळी या कुटुंबातील सगळ्यात छोटी तरुण सदस्य आराध्या बच्चन देखील खूप लोकप्रिय आहे. आराध्या अवघ्या 10 वर्षांची आहे आणि आतापासून सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग भरपूर आहे. आतापासून आराध्याचे एक नाही तर शेकडो फॅनपेज आहेत.

फॅन्सला दिला मॅसेज
नुकतेच आराध्या बच्चनचे दोन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये आराध्या लाल रंगाचा फ्रॉक परिधान केलेलं दिसत आहे याचबरोबर आराध्याने डोक्यावर सांताक्लॉजसारखी  टोपी घातल्याचं दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये ती एका इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती लोकांना संदेश देताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणतेय की, 'कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांना मदत करण्याची हीच वेळ आहे'.

स्वार्थ न ठेवता लोकांचा विचार करण्याची हीच वेळ आहे. ख्रिसमसशिवाय वर्षभर सांता असण्याची आपण कल्पना करू शकतो का? याचा जरूर विचार करा' हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते आराध्याच्या भावनेचं कौतुक करताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर पॉप्यूलर आहे आराध्या बच्चन 
जगभरात कोरोनाची रुग्ण वाढत आहेत. जिथे अभिषेक आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्याचा हा व्हिडिओ चाहत्यांना सकारात्मक विचार देत आहे. आराध्याचा हा पहिला व्हिडिओ नाहीये. जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. याआधीही आराध्याचे अनेक डान्स व्हिडिओ आणि अनेक स्पीच व्हिडिओंनीही चाहत्यांची मने जिंकली आहेत.