अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्या जवळ अभिषेकनं खरेदी केली कोटींची प्रॉपर्टी! 1 महिन्यापूर्वी खरेदी केले 6 अपार्टमेंट

Abhishek Bachchan Buys New Property : गेल्या महिन्यात 6 अपार्टमेंट आणि या महिन्यात अभिषेकनं लगेच नवी प्रॉपर्टी... 

दिक्षा पाटील | Updated: Sep 20, 2024, 03:46 PM IST
अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्या जवळ अभिषेकनं खरेदी केली कोटींची प्रॉपर्टी! 1 महिन्यापूर्वी खरेदी केले 6 अपार्टमेंट title=
(Photo Credit : Social Media)

Abhishek Bachchan Buys New Property : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चननं बॉलिवूडमध्ये स्वत: चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिषेकचं खासगी आयुष्य हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. त्याचं चर्चेत येण्याचं कारण एक मोठी बातमी आहे. त्यानं मुंबईमध्ये एक नवी प्रॉपर्टी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. ते देखील मुंबईतल्या एका उच्चभ्रू परिसरात. त्यामुळे अभिषेक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या या पॉपर्टीविषयी सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. 

अभिषेकला घेऊन अशी माहिती समोर आली आहे की त्यानं मुंबईमध्ये एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे. असं म्हटलं जातं की त्यानं वडील अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याच्या जवळ एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे. 'बॉम्बे टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, अभिषेकनं मुंबईच्या बोरीवली परिसरात एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ती प्रॉपर्टी त्याचे वडील अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' या बंगल्याच्या अगदी जवळ आहे. तर त्यानं घेतलेल्या या प्रॉपर्टीची किंमत कोटींमध्ये असल्याचे म्हटले जाते. रिपोर्टमध्ये हे देखील सांगितलं आहे की बच्चन कुटुंबाजवळ एकाच परिसरात अशा अनेक प्रॉपर्टी आहेत आणि ही त्यांच्या कलेक्शनमध्ये जोडण्यात आलेली एक नवी प्रॉपर्टी आहे. अभिषेकनं खरेदी केलेल्या या प्रॉपर्टीमधून जुहू बीचचा सीन दिसतो. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की अक्षय कुमारनं देखील या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. खरंतर, अभिषेकनं या प्रॉपर्टीमध्ये किती रुपयांची गुंतवणूक केली आहे याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, त्याच्या या गुंतवणूकीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्याचं कारण म्हणजे दोन महिन्यांपूर्वी त्यानं मुंबईत 6 नवे फ्लॅट खरेदी केले होते. 

दरम्यान, एका रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चननं ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये 6 फ्लॅट खरेदी केले होते. Zapkey.com नं दिलेल्या माहितीनुसार, ही माहिती समोर आली आहे की अभिनेत्यानं कोटींची गुंतवणूक केली होती. मुंबईच्या बोरीवली परिसरात त्यानं ही गुंतवणूक केली आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यानं एकूण 4,894 स्क्वेअर फूटमध्ये ही गुंतवणूक केली आहे. तर या संपूर्ण स्क्वेअर फीटची किंमत ही 31,498 आहे. 

हेही वाचा : पहिल्याच चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता दाखवलेली अभिनेत्री आज एका डान्ससाठी घेते 1,50,00,000 चं मानधन

रिपोर्ट्सनुसार, 57 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये त्यानं 6 अपार्टमेंट खरेदी केले आहेत. तिथे त्याचे दहा पार्किंग आहेत. यात दोन अपार्टमेंट हे 252 स्क्वेअर फूटचे आहेत. तर बाकी दोन हे 1,100 आणि 1,049 स्क्वेअर फूटचे आहेत. सगळ्यात लक्षवेधी गोष्टमध्ये अभिषेकनं या सगळ्या बातम्यांवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.