रागाच्या भरात अभिषेक बच्चननं कापले बहिणीचे केस; इतकं काय घडलेलं?

Abhishek Bachchan and Shweta Fight : अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी नुकतीच What The Hell Navya शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी श्वेतानं हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 16, 2024, 01:02 PM IST
रागाच्या भरात अभिषेक बच्चननं कापले बहिणीचे केस; इतकं काय घडलेलं? title=
(Photo Credit : Social Media)

What The Hell Navya Season 2 Abhishek Bachchan: भाऊ-बहीण म्हटलं की घरात छोटी-मोठी भांडण, मस्ती तर होतात. कधी कोणाचे केस ओढणं कधी कोणाची आई-वडिलांकडे तक्रार करणं. हे कोणत्याही सर्वसाधारण कुटुंबापासून ते सेलिब्रिटींच्या कुटुंबातही होतं. अनेकदा आपण भावंडांना मोठं झाल्यावर ही सगळी भांडणं आठवत हसवताना पाहतो. असाच एक किस्सा नुकताच श्वेता बच्चननं सांगितला आहे. यावेळी श्वेतानं खुलासा केला की भाऊ अभिषेक बच्चनसोबत त्यांचं खूप मोठं भांडण झालं होतं आणि अभिषेकनं चिडून तिचे केस कापले होते. 

श्वेतानं हा संपूर्ण किस्सा लेक नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टवर शेअर केला आहे. What The Hell Navya च्या दुसऱ्या सीझनमध्ये बोलत असताना नव्या आई श्वेताला त्या घटनेची आठवण करून देते, जेव्हा अभिषेकनं तिचे केस कापले होते. ते ऐकताच श्वेताला हा संपूर्ण किस्सा आठवला आणि तिनं सांगायला सुरुवात केली आणि म्हणाली, त्यानं खरंच माझे केस कापले होते. शोमध्ये जया बच्चन या देखील होत्या. त्या हे ऐकल्यानंतर जोरात हसू लागल्या. जया त्यानंतर म्हणाल्या की अभिषेकनं श्वेताच्या डोक्याच्या मधल्या भागातील केस कापले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिषेकनं असं का केलं? याचं कारण देखील श्वेतानं सांगितलं. श्वेता म्हणाली, 'आमचं भांडण झालं होतं. रात्री आई-बाबा बाहेर होते आणि आमच्यात कोणत्या एका गोष्टीवरून भांडण झालं होतं. त्याला कैची कशी मिळाली हे मला माहित नाही, त्यानं माझे केस पकडले आणि कापून टाकले. मला तसंचं शाळेत जावं लागलं. आजी माझ्या केसात पिन लावायची.'

या व्हिडीओत नव्या नवेली नंदानं याचा देखील खुलासा केला की आजोबा म्हणजेच अमिताभ बच्चन यांना हे मुळीच माहित नव्हतं की त्यांच्या घरातील मुली आणि सुना यांचे छोटे केस असतील. श्वेतानं सांगितलं की बाबांना मोठे केस आवडायचे. लहाण असताना जर श्वेतानं केस कापले तर अमिताभ लगेच रागवायचे. श्वेताला ओरडायचे आणि बोलायचे की तू केस का कापलेस. 

हेही वाचा : 20 रुपये तोळं सोनं होतं तेव्हा एका शोसाठी घ्यायची 3000 रुपये; एके काळी महात्मा गांधींनी मागितली होती 'या' गायिकेकडे मदत

श्वेता आणि जया यांनी दोघांनी नव्याच्या या पॉडकास्टमध्ये हजेरी लावल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या चर्चेत राहतात.