मुंबई : अभिषेक बच्चन यानं पलटन या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला आहे. चित्रपटाचं शूटिंग सुरू व्हायच्या २४ तास आधी अभिषेकनं त्याला या चित्रपटात काम करायला जमणार नसल्याचं सांगितलं आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे मी या चित्रपटात काम करू शकत नाही, असं अभिषेकनं सांगतिल्याची प्रतिक्रिया निर्माती निधी दत्तानं सांगितलं आहे. अभिषेक बच्चनच्या ऐवजी दुसरा कलाकार लवकरच शोधू, अशं निधी दत्ता म्हणाली आहे.
पलटन या चित्रपटाचे दिग्दर्शक जे.पी.दत्ता आहेत. जे.पी.दत्ता यांच्याच रेफ्यूजी या चित्रपटातून अभिषेकनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तसंच एलओसी कारगील आणि उमराव जान चित्रपटामध्येही दोघांनी काम केलं होतं.
तीन महिन्यांपूर्वीच पलटन या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता. लडाखमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार होती. पण शूटिंग सुरू होण्याआधीच त्यानं काम न करण्याचा निर्णय निर्माते-दिग्दर्शकांना कळवला. पलटन हा चित्रपट युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अनेक कलाकार आहेत.