'सोशल मीडिया' सेन्सेशन दानिशचा वाशीजवळ अपघातात मृत्यू

सोशल मीडिया इन्स्टाग्राम पेजवर दानिशच्या फॉलोअर्सची संख्या १ दशलक्षहून अधिक

Updated: Dec 21, 2018, 12:55 PM IST
'सोशल मीडिया' सेन्सेशन दानिशचा वाशीजवळ अपघातात मृत्यू title=

मुंबई : सोशल मीडिया 'यूट्यूब'वरून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेला आणि एमटीव्हीच्या रिएलिटी शो 'एस ऑफ स्पेस'चा एक स्पर्धक दानिश जेहन अपघाती मृत्यू झालाय. दानिशच्या मृत्यूनं नातेवाईकांसहीत छोट्या पडद्याशी निगडीत अनेकांना धक्का बसलाय. मुंबईच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाशी निगडीत दानिशनं २१ व्या वयातच स्वत:ची वेगळी छाप पाडली होती... सोशल मीडियावर तो खूपच लोकप्रिय ठरला होता.

एका लग्नात सहभागी झालेला दानिश मुंबईत परतत असताना त्याच्या कारचा वाशीजवळ अपघात झाला... यातच त्याचा मृत्यू झाला. उल्लेखनीय म्हणजे, सोशल मीडिया इन्स्टाग्राम पेजवर दानिशच्या फॉलोअर्सची संख्या १ दशलक्षहून अधिक आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Danish tu humesha Zehen main Rahega, how do I tell the other houseguests that you aren't coming back. You are the coloured hair king of AceOfSpace #Coolestbadboi You looked like a baby as I saw you lying down, thinking you could wake up anytime. You have long gone but you shall remain always in my #Zehen Thankyou for teaching me this word ️

A post shared by Vikas Gupta (@lostboyjourney) on

'बिग बॉस - सीझन ११' फेम प्रोड्युसर विकास गुप्तालाही दानिशच्या जाण्यानं धक्का बसलाय. विकासनं सोशल मीडियावर दानिशला श्रद्धांजली व्यक्त केलीय. 'दानिश तू नेहमीच आमच्याजवळ राहशील' असं विकासनं म्हटलंय. 

यूट्यूबवर दानिशनं एका व्हिडिओत आपला आत्तापर्यंतचा प्रवास आणि संघर्षही शेअर केला होता. हा व्हिडिओ पाच लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय.