अभिनेता अरमान कोहलीकडून गर्लफ्रेंड मीनू रंधवाला मारहाण; गुन्हा दाखल

अरमान आणि तिची मुलाखत एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. पुढे ही ओळख मैत्रीमध्ये बदलली आणि पुढे दोघे एकमेकांना डेटही करू लागले. 

Updated: Jun 5, 2018, 11:53 AM IST
अभिनेता अरमान कोहलीकडून गर्लफ्रेंड मीनू रंधवाला मारहाण; गुन्हा दाखल title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉसमधील एक स्पर्धक अरमान कोहली याच्यावर मुंबईतील सांताक्रूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अरमान कोहली याची गर्लफ्रेंड मीनू रंधवा हिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अरमान कोहलीने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मीनूने आपल्या तक्रारीत केला आहे.

पीडिता रूग्णालयात दाखल

मीनू रंधवाने म्हटले आहे की, अरमानने केलेल्या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार आरमान कोहलीवर मारहाणीचा आरोप करणारी पीडिता सध्या मुंबईतील कोकीळाबेन रूग्णालयात दाखल झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू असून, तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या कलमाखाली अरमानवर गुन्हा दाखल केला आहे.

अरमानवर मारहाणीचा यापूर्वीही आरोप

दरम्यान, अरमान आणि त्याची गर्लफ्रेंड सुमारे २०१५ पासून लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहतात. अरमान आणि तिची मुलाखत एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. पुढे ही ओळख मैत्रीमध्ये बदलली आणि पुढे दोघे एकमेकांना डेटही करू लागले. तिने यापूर्वीही अरमानवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तारक मेहता का उलटा चष्मामधील बबीताजी म्हणजेच मुनमुन दत्तानेही अरमानवर मारहाण केल्याचा आरोप केला होता.  अरमान आणि मुनमुन २००८ मध्ये एकमेकांसोबत होते.