Mahesh Manjarekar Health Update : महेश मांजरेकर यांच्यावर Bladder Cancer सर्जरी; आजारपणातील पहिला फोटो समोर

आजारपणाविषयी कळताच चाहत्यांच्या वर्गातून चिंता व्यक्त करण्यात आली

Updated: Aug 23, 2021, 04:52 PM IST
Mahesh Manjarekar Health Update : महेश मांजरेकर यांच्यावर Bladder Cancer सर्जरी; आजारपणातील पहिला फोटो समोर title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Mahesh Manjarekar Health Update : मराठी आणि हिंदी चित्रपट जगतामध्ये आपल्या नावाचा आणि कर्तृत्त्वाचा दबदबा असणाऱ्या महेश मांजरेकर यांच्यावर कॅन्सरचे उपचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि अनेकांनाच धक्का बसला. 

काही दिवसांपूर्वीच मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांना युरिनरी ब्लॅडर कॅन्सर झाल्याचं निदान समोर आलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर उपचारांचाच एक भाग म्हणून सर्जरी करण्यात आली. जवळपास 10 दिवसांपूर्वी ही अतिशय महत्त्वाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता मांजरेकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

मुंबईतील एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन येथे महेश मांजरेकर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आता ते अतिशय चांगल्या पद्धतीने या आजारातून सावरत असल्याचं कळत आहे. इतकंच नव्हे, रुग्णालयातील उपचारांनंतर आता ते घरीही परतले आहेत. त्यामुळं ही बाब सर्वांनाच दिलासा देऊन जात आहे. 

सोशल मीडियावर मांजरेकर यांच्या या गंभीर आजारपणाविषयी कळताच चाहत्यांच्या वर्गातून चिंता व्यक्त करण्यात आली. ज्यानंतर ते कॅन्सरवही मात करत असल्याचं कळताच चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला. 

आजारपण, उपचारांच्या याच चर्चांदरम्यान आता मांजरेकर यांचा हल्लीटाट एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो त्यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावरील या फोटोमध्ये मांजरेकरांसोबत इंडियन आयडॉल 12 या रिअॅलिटी शो मधील अंतिम फेरीतील स्पर्धक दिसत आहेत. आजारपणामुळं मांजरेकर यांच्या आरोग्यावर आणि शरीरयष्टीवर याचे थेट परिणाम झाल्याचं त्यांच्याकडे पाहताच लक्षात येत आहे. असं असलं तरीही आता मात्र, कॅन्सरलाही त्यांनी नमवलं आहे हीच बाब महत्त्वाची ठरत आहे.