मुंबई : अभिनेता जॅकी श्रॉफ बॉलिवूडमधील काही बड्या नावांपैकी एक आहे. दिलखुलास व्यक्तिमत्त्व अशी ओळख असणारा जॅकी श्रॉफ त्याच्या करियरच्या सुरूवातीच्या काळात चाळीत राहत होता. नुकतीच त्याने चाळीतील 'त्या' घराला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
जॅकी श्रॉफ यांचे मूळ नाव जयकिशन काकूभाई श्रॉफ आहे. हिंदी सिनेसृष्टीट येण्यापूर्वी जॅकी श्रॉफ मलबार हिल परिसरातील तीन बत्ती चाळीमध्ये आईसोबत राहत होते. 1983 साली 'हिरो' चित्रपट आला आणि जॅकी श्रॉफ यांचे नशीब पालटले.
नुकतीच जॅकी श्रॉफ आणि तीन बत्ती चाळीला भेट दिली. त्याचे काही व्हिडिओ सोशलमीडियावर झपाट्याने शेअर होत आहेत. इंस्टाग्रामवर अभिनेता अरजन बाजवा यांनी तीन खास व्हिडिओ शेअर केले आहेत.
आगामी 'फॅशन' चित्रपटामध्ये अरजन बाजवा यांनी खास व्हिडिओद्वारा चाहत्यांना जॅकी श्रॉफ यांच्या घराची ओळख करून दिली आहे. एका व्हिडीओमधून जॅकी श्रॉफनी लांबूनच घराची खोली दाखवली. त्यानंतर दुसर्या व्हिडिओमध्ये घराकडे जाणारा मार्ग दाखवला. तर तिसर्या व्हिडिओमध्ये जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या घरात स्वयंपाकघर कुठे होते हेदेखील दाखवले.
आईसोबतच्या काही आठवणींना त्यांनी या व्हिडिओत उजाळा दिला आहे.
बॉलिवूडप्रमाणेच काही मराठी सिनेमांमध्ये अभिनेते जॅकी श्रॉफ दिसले. त्यानंतर आता लवकरच जॅकी श्रॉफ एका गुजराती सिनेमातही दिसणार आहेत. हा जॅकी श्रॉफ यांचा पहिला गुजराती सिनेमा आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. जॅकी श्रॉफ यांच्या आगामी गुजराती सिनेमाचं नाव 'वेंटिलेटर' आहे. जॅकी श्रॉफ केवळ हिंदी सिनेमातूनच नव्हे तर इतर अनेक भारतीय भाषेमधून चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. गुजराती ही '11'वी भारतीय भाषा आहे, ज्यामध्ये जॅकी श्रॉफ काम करणार आहेत.
जॅकी श्रॉफच्या वडिलांचा गुजरातशी संबंध होता. त्यामुळे जॅकी श्रॉफच्या आयुष्यातील हा पहिला गुजराती सिनेमा खास आहे असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे. गुजराती भाषेतील पात्राला पुरेसा न्याय देण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम राहण्याचा प्रयत्न करेन असेही त्यांनी म्हटलं आहे.