अभिनेत्याचा बेडरुममधील पत्नीसोबतचा तो फोटो व्हायरल !

 बेडवरील फोटो त्याने शेअर केला आहे. 

Updated: Nov 28, 2021, 04:47 PM IST
अभिनेत्याचा बेडरुममधील पत्नीसोबतचा तो फोटो व्हायरल !

मुंबई : बिग बॉस 15 मधून बाहेर पडल्यानंतर लोकप्रिय टीव्ही अभिनेता जय भानुशाली घरी परतला आहे. घरी आल्यानंतर जयने आपल्या कुटुंबासोबत शांत झोप घेतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

पत्नी माही विज आणि मुलगी तारासोबत बेडवरील फोटो त्याने शेअर केला आहे. बिग बॉसच्या घरातून बेदखल झाल्यानंतरच्या भावना जयने व्यक्त करत ही पोस्ट शेअर केली आहे. 

जय भानुशालीने फोटो शेअर केला आणि लिहिले- 'कुटुंबासोबत आणि बदलासाठी सकाळी लवकर उठायचे नाही आणि माझ्या खऱ्या आयुष्यातील बिग बॉस माही विज आणि तारासोबत.. ' फोटोमध्ये जय जिथे शांत झोपलेला दिसत होता, तिथे माही त्यांच्या हातावर किस करत आपल्या भावना व्यक्त करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यांची मुलगी तारा आई-वडिलांच्या मध्ये चादरीच्या आत कॅमेरा पाहत होती. तिघांचा हा बेडरूमचा फोटो म्हणजे सुखी कुटुंबाचा निवांत फोटो आहे.

यापूर्वी जयने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो घराबाहेर काढल्यानंतर घरी परतताना दिसत होता. व्हिडिओमध्ये जय आणि माही बऱ्याच दिवसांनी एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

त्यांच्या री-युनियनवर मित्र आणि चाहत्यांनीही प्रेमळ प्रतिक्रिया दिल्या आहेत. जयच्या घरी परतण्यापूर्वी त्याची लहान मुलगी ताराही पप्पांना भेटायला उत्सुक होती. बिग बॉस 15 मध्ये हे दोघे जयसोबत आले होते