घटस्फोटाच्या अफवांदरम्यान मिस्ट्री गर्लसोबत दिसला युजवेंद्र चहल, तोंड लपवत जातानाचा Video Viral

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: धनश्री वर्मापासून घटस्फोटाच्या अफवांदरम्यान, भारताचा स्टार खेळाडू युझवेंद्र चहल एकामिस्ट्री गर्लसोबत दिसला.  

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 8, 2025, 06:54 AM IST
घटस्फोटाच्या अफवांदरम्यान मिस्ट्री गर्लसोबत दिसला युजवेंद्र चहल, तोंड लपवत जातानाचा Video Viral  title=

Yuzvendra Chahal Dhanashree Divorce: भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची कोरिओग्राफर असलेली पत्नी धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट झाल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहेत. या चर्चेला सुरुवात झाली जेव्हा अलीकडेच दोघांनी एकमेकांचे इन्स्टाग्राम हँडल अनफॉलो केले. याशिवाय चहलने त्याच्या प्रोफाईलवरून एंगेजमेंट आणि लग्नाचे फोटो काढून टाकले तेव्हा ही बातमी मीडीयामध्ये वणव्यासारखी पसरली. याला दोघांपैकी कोणाकडूनही अधिकृत दुजोरा दिला नसला तरी सोशल मीडिया साईट्सवर त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. याच दरम्यान आता युजवेंद्र चहलचा एका मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

युजवेंद्र चहल दिसला मिस्ट्री गर्लसोबत 

घटस्फोटाच्या अफवांदरम्यान, चहल आणि युझवेंद्र अलीकडेच मुंबईत एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला. या तरुणीबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही, मात्र असा दावा केला जात आहे की जेव्हा चहल तिच्यासोबत हॉटेलमध्ये दिसला तेव्हा तो चेहरा लपवताना दिसला होता.याचा एक व्हिडीओही समोर आला असून यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओमुळे आता क्रिकेटरचे अफेअर असल्याचे सर्वांनाच वाटू लागले आहे.

हे ही वाचा: "मला कोणताही पश्चाताप नाही...", आर अश्विननंतर आता 'या' भारतीय खेळाडूने घेतली निवृत्त

 

2022 मध्ये धनश्रीने आडनाव काढून टाकले

2022 मध्ये धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून चहलचे आडनाव बदलले आणि सर्वांना आश्चर्यचकित केले आणि तेव्हापासून त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. मग त्याच वेळी, चहलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये 'नवीन जीवन लोड होत आहे' असे म्हटले होते. 

हे ही वाचा: Video: 62 चेंडूत संपला कसोटी सामना, ठरली रक्तरंजित मॅच; खेळपट्टीवर फलंदाज रक्तबंबाळ!

 

लोकप्रिय कोरिओग्राफरसोबत जोडले जात आहे धनश्रीचे नाव 

घटस्फोटाच्या या चर्चेदरम्यान धनश्री वर्मा लोकप्रिय कोरिओग्राफर प्रतीक उतेकरला डेट करत आहे असं म्हंटलं जात आहे. धनश्री आणि प्रतीकचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अफवा सुरू झाल्या.