मुंबई : बॉलिवूडमधील धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र यांच्यावर त्यांच्याच 47 वर्षीय चुलत बहिणीने लैंगिक शोषणाचा आज आरोप लावला आहे. साठच्या दशकात स्टार अभिनेता असलेल्या जितेंद्रवर हा आरोप करण्यात आला आहे. मात्र जितेंद्र यांचे वकील रिजवान सिद्दिकी यांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले.
Veteran Bollywood actor Jeetendra(Ravi Kapoor) accused of sexually harassing his cousin in January 1971. The complaint has been filed with Himachal Pradesh's Director General of Police. (file pic) pic.twitter.com/9u7LGcMRcb
— ANI (@ANI) February 8, 2018
आरोप लावताना म्हटलं आहे की, हिमाचल प्रदेशच्या पोलिसी अधिकाऱ्यांकडे याची तक्रार करण्यात आली आहे. ही घटना शिमलामध्ये जानेवारी 1971 मध्ये झाली असून त्यावेळी पीडित व्यक्ती 18 वर्षाची असून अभिनेता जितेंद्र 28 वर्षाचे होते.
तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, जितेंद्र यांनी दिल्लीवरून शिमला आणण्याची व्यवस्था केली होती. शिमलामध्ये जितेंद्र एका सिनेमाचं शुटिंग करत होते. महिलेने दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र दारूच्या नशेत असताना महिलेच्या रूममध्ये पोहोचले आणि दोन बेड एकत्र जोडून तिथे त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र जितेंद्र यांचं वकील या गोष्टीला नाकारत आहेत.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, एवढा काळ मी शांत होती. परंतु आई-वडिलांच्या निधनानंतर मी याविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला. कारण माझ्या आई-वडिलांना जर ही घटना समजली असती, तर त्यांना प्रचंड धक्का बसला असता. त्यामुळे मी एवढ्या वर्षांपासून मानसिक यातना सहन करीत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून जगभरात #MeeToo हे अभियान राबविले जात असल्यानेच मी हिंमत करून याविषयी आवाज उठविला आहे.
वकिलांच्या म्हणण्यानुसार, जितेंद्र स्वतः या सर्व आरोपांचे खंडन करत आहेत. तब्बल 50 वर्षानंतर या जुन्या आणि निरर्थक आरोपांना कुठलाही कायदा एंटरटेन करीत नाही. कायद्यानुसार कुठलीही तक्रार तीन वर्षांच्या आत करायची असते. जेणेकरून आरोपानुसार तपास करता येईल. जितेंद्र यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.