Kiran Mane Post : अभिनेता किरण माने यांनी 'बिग बॉस मराठी' असो किंवा 'मुलगी झाली हो' या दोन्ही माध्यमातून प्रेक्षकांच मन जिंकल आहे, कायमच आपल्या बेधडक स्वभावामुळे किरण माने चर्चेतही राहिले आहेत. सध्या अशीच एक किरण मानेंची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या 'Thank You For Coming' या सिनेमाचं त्यांनी कौतुक केलं आहे यासाठी त्यांनी भली मोठी पोस्टही लिहिली आहे. स्त्रियांच्या ऑरगॅझमबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
...मागच्या आठवड्यात एका सिनेमाचं कौतुक करताना एका जाणकार समीक्षकानं लिहिलं होतं की, 'क्लायमॅक्स फसलाय, पण सिनेमा छान आहे !'...वाचून म्हणाले, च्यायला हे कसं शक्य आहे..? 'क्लायमॅक्स' फसणारी कुठलीही गोष्ट चांगली कशी असू शकते??? उत्तम क्लायमॅक्ससाठी तर आयुष्यात सगळा झगडा सुरू असतो आपला...असो. ...तर अशा एका अति महत्त्वाच्या 'क्लायमॅक्स' बद्दल बिनधास्त बोलनारा भन्नाट पिक्चर परवा बघितला... 'थॅंक यू फॉर कमिंग' ! सेक्समध्ये स्त्रियांना हव्या असणार्या 'ऑरगॅजम'बद्दल मनोरंजनातनं काहीतरी सांगू पहाणारा असा भारतीय 'मेन स्ट्रीम' सिनेमा आजपर्यंत मी तरी पाहिला नव्हता.
खरंतर याच आपल्या भारत देशानं हजारो वर्षांपूर्वी वात्स्यायन नांवाचा खराखुरा फेमिनिस्ट विचारवंत दिला. ज्यानं 'कामसूत्र' ग्रंथात लिहीलंय की 'सेक्समध्ये स्त्रियांच्या लैंगिक सुखालाही समान महत्त्व आहे. उत्तम सेक्स तोच असतो ज्यात स्त्री आणि पुरुष दोघेही एकत्र तृप्तीच्या चरमसीमेपर्यंत अर्थात क्लायमॅक्सपर्यन्त पोहोचतात.'
असा सिनेमा लिहिल्याबद्दल राधिका आनंद - प्रशस्ती सिंग या लेखिकांच्या जोडीला सलाम केला पायजे. पुरूषांसाठी स्त्रिचा 'जी पाॅईंट' शोधणं जितकं कठीण, तितकंच स्त्रिसाठी त्या गोष्टीचं महत्त्व एक्सप्लेन करणं अवघड... ते काम या दोघींनी अतिशय सहजपणे केलंय. सेक्स... विशेषत: स्त्रियांनी सेक्सवर मोकळेपणानं बोलण्यामुळं ज्यांच्या भावना दुखावतात, त्या भावांनी हा सिनेमा जिथे लागलाय, त्या थिएटरच्या जवळपासबी फिरकू नये. 'थॅंक यू फॉर कमिंग' लैच ग्रेट नसला तरी एकवेळ आवर्जुन बघणेबल नक्कीच हाय ! - किरण माने.
महिलांचे ऑरगॅजम किती महत्त्वाचे हे पुरुषांना बऱ्याचदा माहितच नसते. फक्त सेक्सकडे केवळ दोन चार मिनिटांचा खेळ आहे, असा समज असणाऱ्या पुरुषांसाठी हा सिनेमा अत्यंत महत्त्वाचा आहे, असं किरण माने सांगतात.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.