अभिनेता कुशल बद्रिके 'मेंटल स्ट्रेस'चा शिकार? पोस्ट शेअर करत म्हणाला...

'झी मराठी' वाहिनीवरील प्रसिद्ध शो 'चला हवा येवू द्या.' या शोमधून अभिनेता कुशल बद्रिके घरा-घरात पोहचला. या शो आधी कुशल 'फु बाई फू' या कार्यक्रमात दिसला होता. कुशल नेहमीच त्याच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणे त्याच्या पर्सनला लाईफमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी कुशल त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. 

Updated: Jan 14, 2024, 11:45 AM IST
अभिनेता कुशल बद्रिके 'मेंटल स्ट्रेस'चा शिकार? पोस्ट शेअर करत म्हणाला... title=

मुंबई : 'झी मराठी' वाहिनीवरील प्रसिद्ध शो 'चला हवा येवू द्या.' या शोमधून अभिनेता कुशल बद्रिके घरा-घरात पोहचला. या शो आधी कुशल 'फु बाई फू' या कार्यक्रमात दिसला होता. कुशल नेहमीच त्याच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणे त्याच्या पर्सनला लाईफमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी कुशल त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असणाऱ्या कुशलने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. मात्र शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने मेंटल स्ट्रेसवर भाष्य केलं आहे. त्याची ही पोस्ट पाहून चाहतेही हैराण झाल्याचं दिसत आहे. खरंतर कुशलने शेअर केलेली ही पोस्ट पत्नीच्या वाढदिवसाठी आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने पत्नी सुनैना बद्रिकेला शुभेच्छा दिल्या आहेत. 

कुशलने पत्नीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत कुशलने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''संसार म्हंटल की व्यवहार आला आणि व्यवहार म्हंटल की हिशोब .
आता हिशोब लावला, “तुझ्या-माझ्या” नात्याचा. बापरेऽऽ! किती उधारी वाढली आहे माझ्यावर तुझी! आपल्या पहिल्या घराचं booking करण्यासाठी तुझी एकमेक असलेली policy मोडली होती आपण, आता पुन्हा नवीन घर घेता येईल, पण ती “ती वेळ” परत करण्याची policy अजून कोणत्याच company कडे नाही बघ.

एका दसऱ्याला “झेंडूची फूलं” परवडत नाहीत म्हणून देवा समोर नुसताच दिवा लाऊन साजरा केलेला दसरा आठवतोय. आता फुलांनी सडे सजवता येतील मला, पण तो दसरा तुला परत कसा करू ? सांग !अक्षय तृतीयाला सोनं घ्यायचं , संक्रांतीला काळी साडी नेसायची अश्या सगळ्या “प्रथा” माहीत होत्या तुला, पण तुझा अवघा जन्म माझ्या “व्यथा” जपण्यात गेला यार…
आता परवा परवाचीच गोष्ट नाही का ? mental stress च्या नावाखाली मी रात्रभर टक्क जागा होतो आणि माझ्या उशाशी बसून तू माझ्या पाठी वरून हाथ फिरवत बसली होतीस….
ही तुझ्यातल्या आईची माया कसा परत करू शकणार आहे मी ?माझ्या साठी जन्म वाहणाऱ्या मुली तुझ्या कोणत्याच भावनेची परतफेड करता येणार नाही मला. तुझं खूप देणं लागतो पण जाणिवां पलिकडे काहीही देता येणार नाही मला. sorry आणि happy birthday (सुकून ).''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या कुशलची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बापरे, एवढं इमोशनल... एकदम अप्रतिम, शेवटची ओळ तर ...एकदा वेळ निघून गेल्यावर जाणिवांपलीकडे काहीही देऊ शकत नाही आपण आपल्या प्रियजनांना.. तर अजून एकाने लिहीलं आहे की, तिच्यातला मी आणि माझ्यातली ती तसेच आहोत फक्त वेळ बदलत गेला,, बदल नाही ते प्रेम (जुनुन). तर अनेकांनी सुनैना बद्रिकेवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.