मुंबई : नुकताच महेश मांजरेकर दिग्दर्शित करुन गेलो गाव या नाटकाचा 100 वा प्रयोग पार पडला. या प्रयोगाला मनसे नेते राज ठाकरे देखील उपस्थित राहिले होते. भाऊ कदम यांचे हे नाटक २०११ साली प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता १० वर्षांनी पुन्हा एकदा हे नाटक रंगमंचावर आलं आहे. आणि पाहता पाहता या नाटकाचे १०० प्रयोगही नुकतेच पार पडले. हा शतक मोहोत्सवी प्रयोग माटुंग्याच्या यशवंतराव नाट्यगृह येथे सायकांळी ४ वाजता हा शो आयोजित करण्यात आला होता.
या 100 व्या नाटकाच्या प्रयोगा निमीत्त या नाटकाच्या टीमने झी २४ तासला नुकतीच मुलाखत दिली आहे. 'करुन गेलो गाव' हे नाटक कोकणावर बोलणार आहे. यावेळी दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता ओंकार भोजने, भाऊ कदम, महेश मांजरेकर आणि निर्माते राहुल भंडारे येथे उपस्थित होते. यावेळी बोलताना महेश मांजरेकर कोकणातील रस्त्यांवर व्यक्त होत संताप व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की, ''कोकणातील माणूस कसा ओळखायचा माहितीये का? तर गणपतीमधून आल्यावर तो असा असा हलत असेल ना. की तो त्या बसमधून उतरुन आल्यावर तो पुढचा महिनाभर असाच असतो. कारण येवढे ते खड्डे. म्हणजे मला काही कळत नाही की, हे रस्त्ये म्हणजे की, मी कधी-कधी विनोदात असं म्हणतो की, कोकणातला जो रस्ता आहे ना जो इंडियातले सगळे रस्त्ये आहेत ना मग तिथे सगळे इंडिनिअर्स आहेत. तिकडे रस्त्ये बनवणारे. आपले कामगार आहेत. त्यांना ड्रेनिंग ग्राऊंड म्हणून कोकणातला रस्ता तसा ठेवलाय.
तो बनवायचा नाही. तो त्यांना शिकायला की, खड्डे... रस्ते कसे असावेत कसे असू नयेत. प्रॅक्टिस ग्राऊंड आहे ते. हे बघा ईथे आणि मग रस्त्ये बनवा तिथे हा बनवायचा नाही. म्हणजे अरे म्हणजे मी कित्येक वर्ष जातो आणि मला खूपच आवडायचं आधी मला असं वाटातं की हा जो आधी जायचो मुंबई गोवा किंवा माझ्या गावी जायचो रत्नागिरीला जायचो, लांजाला जायचो, सावंतवाडीला जायचो. बरे होते की, रस्त्ये म्हणजे जे चौपदरीकरण नसतं झालं तर बरं झालं असतं असं वाटायला लागलंय. मग हे चौपदरीकरण करायला लागल्यापासून कठिण झालंय. म्हणजे काही काही ठिकाणी तर, नाहिच आहेत रस्त्ये. असं वाटायला लागतं आणि त्यामुळे काय झालंय, कोल्हापूर मार्गे जावं लागतं पण माझा जो एक ब्रेथटेकिंग व्ह्यू आहे तो कोकणाच्या रस्त्याचा बस तो व्हावा एवढीच ईच्छा आहे. आणि आता दोष कोणालाच देऊ शकत नाही. कारण गेले १७ वर्ष चालू आहे. मला वाटतं की, आता यांना एकच वर्ष मिळालंय. त्यामुळे मला असं वाटतंय की, छान करतील रस्ता खंरच कोकणी माणूस त्यांचा फोटो लावेल घरात. कारण कोकणी माणूस एवढा सहनशील का आहे मला माहिती नाही. त्याला काही पडलेलीच नाही.''
'करून गेलो गाव' या नाटकाचा शतक महोत्सवी प्रयोग माटुंग्याच्या यशवंतराव नाट्यगृह येथे संपन्न झाला. ओकांर भोजने आणि भाऊ कदम या नाटकात मुख्य कलाकार आहेत.