Raj Kundra Jail Video : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा त्याच्या मास्कमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या राज कुंद्रा चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्याचा आगामी चित्रपट यूटी69. या चित्रपटाला आपल्याला राज कुंद्राचे तुरुंगातील दिवस पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. राज कुंद्राला 2021 मध्ये पॉनोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे तिथले दिवस कसे होते याविषयी सगळ्यांनाच जाणून घ्यायचे होते. दरम्यान, तुरुंगातील व्हिडीओ समोर आला असून हा कथित व्हिडीओ राज कुंद्राचा असल्याचे म्हटले जाते.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातील एक बराक आहे आणि त्या बराकमध्ये अनेक कैदी बसले आहेत. तर काही कैदी हे त्या बराकमध्ये येत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी एका व्यक्तीदा दाखवण्यासाठी हा व्हिडीओ झूम केला असून तो राज कुंद्रा असल्याचे म्हटले जात आहे. तर व्हिडीओला लक्ष देऊन पाहिले तर त्याच्या डाव्या बाजुला वरती वेळ, तारिख आणि दिवस दिसत आहे. 13 ऑगस्ट 2021 अशी तारिख त्यात दिसून येत आहे.
हेही वाचा : VIDEO : राणी मुखर्जीनं न सांगताच शाहरुखनं केली तिची मदत; कृती पाहून चाहते म्हणाले, 'हाच खरा किंग'
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'चुकीचं काम केलं की असंच होणार, आता तो डबल मास्क लावून येईल.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'कोणी लीक केला हा व्हिडीओ.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'बरं झालं हे दाखवलं. असंच काही दाखवत जा, यांनी हीरो बनवू नका.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ती जागा त्याच्यासाठी योग्य आहे. अनेकांनी त्याच्या चित्रपटासाठी हे सगळं आहे असं म्हटलं आहे.' एक नेटकरी म्हणाला की 'बायोपिकच्या प्रमोशनला सुरुवात झाली.' दुसरा म्हणाला, 'त्यानंच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा व्हिडीओ लीक केला असेल.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हा त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'वेब सीरिज असेल कोणती?' तर अनेकांनी सीरिजच्या प्रमोशनसाठी हे केल्याचं म्हटलं आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.