एखाद्या मुलीला सेक्स करावासा वाटत असेल तर ती...; अभिनेते मुकेश खन्नांचं वादग्रस्त वक्तव्य!

मुकेश खन्ना यांनी आपल्या यु-ट्यूब चॅनेलवर एका व्हिडीओमध्ये मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्या मुली म्हणतात मला सेक्स करायचा आहे त्या....

Updated: Aug 10, 2022, 05:08 PM IST
एखाद्या मुलीला सेक्स करावासा वाटत असेल तर ती...; अभिनेते मुकेश खन्नांचं वादग्रस्त वक्तव्य! title=

Mukesh Khanna Controversy : शक्तिमान' या मालिकेतून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. मुकेश खन्ना यांनी आपल्या यु-ट्यूब चॅनेलवर एका व्हिडीओमध्ये मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. 

काय म्हणाले मुकेश खन्ना?
जर एखादी मुलगी मुलाला म्हणत असेल की मला तुझ्यासोबत सेक्स करायचा आहे, तर ती मुलगी मुलगी नाही, ती धंदा करत आहे. संस्कृत समाजातील मुलगी असे निर्लज्ज कृत्य कधीच करणार नाही. तसं ती करत असेल चांगल्या समाजाची नाही त्यात पडू नका, असं मुकेश खन्ना व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुकेश खन्ना यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनीही त्यांना फैलावर घेतलं आहे. 'सॉरी शक्तिमान, यावेळी तू चुकला आहे तर दुसऱ्या नेटकऱ्याने, म्हातारपणामध्ये शक्तिमान वेडा झाला आहे. अशा  कमेंट्स करत मुकेश खन्ना यांना ट्रोलं केलं जात आहे. मुकेश खन्ना यूट्यूबवर 'भीष्म इंटरनॅशनल' चॅनल चालवतात.  या चॅनेलला जळपास 1.15  सबस्क्राईबर आहेत.
 

दुसरीकडे, मुकेश खन्ना यांनी लोकप्रिय  'शक्तिमान' मालिकेवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. त्याचा टीझरही रिलीज झाला आहे. मात्र यामध्ये शक्तिमान आणि इतर व्यक्तिरेखा कोण साकारणार याची माहिती समोर आलेली नाही.