IPL 2025 Mega Auction Updates in Marathi: सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी आयपीएल 2025 च्या मेगा लिलावा होत आहे. पहिल्या दिवशी 72 खेळाडूंवर बोली लागली. एकूण 467.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. दरम्यान भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलला पंजाब किंग्जने विकत घेतले. आयपीएल मेगा लिलावात पहिल्या दिवशी युजवेंद्र चहलला पंजाब किंग्जने 18 कोटी रुपयांना विकत घेतले. या किंमतीस टीममध्ये सामील झाल्यामुळे चहलला कसे वाटत आहे हे त्याने सांगितलं आहे.
चहल 18 कोटी रुपये अशा मोठ्या रकमेसह नवीन टीममध्ये सामील झाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. कारण ही रक्कम चहलला गेल्या तीन सिजनमध्ये मिळालेल्या एकूण रकमेइतकी आहे. "मला वाटते की मी या किंमतीस पात्र आहे."
हे ही वाचा: कोणत्या संघाकडे किती पैसे उरले आहेत?
"जो ज्या किमतीत खरेदी केला गेला आहे तो त्यास पात्र आहे. काहीवेळा संघांकडे पर्स नसते आणि मुख्य लिलावात संपूर्ण संघासाठी नियोजन करावे लागते. माझ्यासाठी, निवड झाल्याचा अर्थ असा आहे की हे दोन महिने तुम्हाला तुमचा खेळ सुधारण्यास मदत करतील. तुम्ही तरुण असाल किंवा सिनियर. या व्यासपीठावरून तुम्हाला खूप काही शिकण्याची संधी मिळते." असे चहर म्हणाला.
The most expensive spinner (INR 18 Cr) in #TATAIPLAuction's history, #YuzvendraChahal seems to have his investment plans sorted!
#IPLAuctionOnJioStar LIVE NOW on Star Sports Network & JioCinema! pic.twitter.com/uys7LUZ4r0
— Star Sports (@StarSportsIndia) November 24, 2024
भविष्यात अर्शदीप सिंग आणि श्रेयस अय्यर यांच्यासोबत खेळण्याच्या शक्यतेवर चहल म्हणाला की, "मी याबद्दल खूप उत्सुक आहे कारण श्रेयस अय्यर आणि अर्शदीप सिंगसोबत माझे नाते चांगले आहे. रिकी पाँटिंग सरांकडूनही मला खूप काही शिकायला मिळेल. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्यामुळे मोठ्या स्टेडियममध्ये खेळण्याची माझी भीती दूर झाली."
हे ही वाचा: IPL Auction 2025: 'आल्याबरोबर केली कामाला सुरुवात...', कोण आहे किरणकुमार ग्रांधी? सोशल मीडियावर होतायेत Viral
"मी तीन वर्षे अश्विनसोबत खेळलो आणि त्याच्याकडून खूप काही शिकलो, तो एक दिग्गज आहे. तुम्हाला नेहमी तुमच्या सहकारी फिरकीपटूंचा पाठिंबा हवा असतो कारण हा एक टीम गेमआहे. तुमची मदत करण्यासाठी तुमच्याकडे दुसरा फिरकीपटू असणे हे फार उत्तम आहे."