OMG...पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी इतके कोटी घेते प्रियंका

बॉलीवूडपासून हॉलीवूड गाजवणारी प्रियंका चोप्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला डंका वाजवतेय. भारतात तिचे जितके फॅन्स आहेत तितकेच भारताबाहेरही आहेत. याच कारणामुळे ही बॉलीवूड ब्युटी दोनवेळा अमेरिकन टीव्ही जगतातील प्रतिष्ठित अॅवॉर्ड पीपल्स चॉईस जिंकलीये. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 15, 2017, 07:47 PM IST
OMG...पाच मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी इतके कोटी घेते प्रियंका title=

मुंबई : बॉलीवूडपासून हॉलीवूड गाजवणारी प्रियंका चोप्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला डंका वाजवतेय. भारतात तिचे जितके फॅन्स आहेत तितकेच भारताबाहेरही आहेत. याच कारणामुळे ही बॉलीवूड ब्युटी दोनवेळा अमेरिकन टीव्ही जगतातील प्रतिष्ठित अॅवॉर्ड पीपल्स चॉईस जिंकलीये. 

यातच आता जर कोणालाप प्रियंकाला एखाद्या इव्हेंटमध्ये बोलवायचे असेल तर त्यांना त्यासाठी भारी भक्कम रक्कम मोजावी लागेल. मीडिया रिपोर्टनुसार, प्रियंका चोप्राला झी सिने अॅवॉर्डसमध्ये बोलावणे केले जात आहे. या अॅवॉर्डशोमधील एव्हेंटमध्ये पाच मिनिटे परफॉर्म करण्यासाठी तिला साधारण ५ कोटी रुपये दिले जात आहे.

प्रियंका चोप्रा ५ मिनिटांचा परफॉर्म करताना दिसू शकते. प्रियंका चोप्राची प्रसिद्धी पाहता चॅनेलही तिची मागणी पूर्ण करण्यासाठी राजी आहे. याचाच अर्थ परफॉर्मन्ससाठी शोच्या ऑर्गनायजर तिला एका मिनिटासाठी एक कोटी रुपये देणार आहेत. 

priyanka chopra

प्रियंका चोप्रा या वर्षी आपली पहिला हॉलीवूड सिनेमा बेवॉचमध्ये दिसली होती. यासोहतच अमेरिकन टीव्ही शो क्वांटिकेच्या तिसऱ्या सीजनमध्येही ती दिसणार आहे. प्रियंका लवकरच आणखी दोन हॉलीवूडच्या सिनेमांमध्ये दिसणार आहे.