VIDEO : आता तरी मोठा हो...संतप्त चाहत्यांनी रणवीरला झापलं

या 'उडी'ने रणवीर होतोय ट्रोल!

Updated: Feb 6, 2019, 10:55 AM IST
VIDEO : आता तरी मोठा हो...संतप्त चाहत्यांनी रणवीरला झापलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या आगामी 'गली बॉय' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणवीर त्याच्या सुपर एनर्जीसाठी प्रसिद्ध आहे. पण रणवीरच्या याच सुपर एनर्जीमुळे अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. रणवीर प्रमोशमसाठी एका कार्यक्रमात पोहचला होता. त्यावेळी चित्रपटाचं प्रमोशन करता करता रणवीरने प्रमोशनवेळी आलेल्या प्रेक्षकांमध्ये उडी घेतली. रणवीरच्या या उडीमुळे काही लोक जखमी झाले आहेत. इंग्रजी वृत्तपत्र 'मिड'ने याविषयी वृत्त दिले आहे. 

रणवीरच्या या बेताल वागण्याने नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. प्रसिद्ध झालेल्या फोटोमध्ये रणवीर एका प्रेक्षकावर उडी मारताना दिसत आहे. तर दुसरीकडे एक महिला तिच्या डोक्यावर होत ठेऊन दिसत आहे. या फोटोवरून काही लोक जखमी झाल्याचं समजतं आहे. नेटकऱ्यांनी रणवीरला लहान मुलांसारखं वागणं बंद करण्याचा सल्ला दिला आहे तर काहींनी लोकांमध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी तो अशा गोष्टी करत असल्याचं म्हटलं आहे. अशा उड्या मारण्यासाठी रणवीरला पैसे मिळत असण्याचंही काहींनी म्हटलं आहे, 

प्रमोशमवेळी प्रेक्षकांमध्ये उडी मारण्याची रणवीरची ही पहिलीच घटना नाही. याआधीही रणवीरने 'सिंबा' चित्रपटाच्या प्रमोशनवेळी प्रेक्षकांमध्ये उडी मारली होती. 

रणवीर त्याचा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीच कमी ठेवत नाही. त्याचा आगामी चित्रपट जोया इख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' येत्या १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 'व्हेलेंटाइन डे'ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रणवीरसोबत आलियाही प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.