राहुल गांधींची मुलाखत पैसे घेऊन केली - सुबोध भावे

मी शिवसैनिकच आहे...

Updated: May 25, 2019, 03:10 PM IST
राहुल गांधींची मुलाखत पैसे घेऊन केली - सुबोध भावे title=

नाशिक : लोकसभा निवडणूकीच्या आधी अभिनेता सुबोध भावे यांनी पुण्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मुलाखत घेतली होती. या मुलाखतीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली होती. सुबोध भावे हे शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असल्याने त्यांची काँग्रेसच्या मंचावरील उपस्थित अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली होती. त्यानंतर आता सुबोध भावे यांनी यावर खुलासा केला आहे. 'राहुल गांधींची मुलाखत घेण्यासाठी मी पैसे घेतले असून हा माझा व्यवसाय आहे. मी एक शिवसैनिक आहे. राजकीय व्यक्तिमत्व म्हणून मी राहुल गांधींचा आदर करतो. सोशल मीडियावरुन त्यांच्याबद्दल काहीही बोललं जातं. पण देश सोशल मीडिया चालवत नाही. २०१४ ते २०१९ पर्यंत त्यांच्यात बदल झाला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांतही ते काही वेगळे असतील' असं सुबोध भावेंनी म्हटलंय. 

लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतदानाआधी राहुल गांधींनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. सुबोध भावे यांनी कार्यक्रमाचं सुत्रसंचालन केलं होतं. या कार्यक्रमानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. या चर्चेवर पडदा टाकत सुबोध भावेंनी मी काँग्रेसच्या व्यासपीठावर गेलो होतो. मात्र, त्यासाठी मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतली असल्याचं सांगितलं होतं. 

 
 
 
 

मी रंगभूमीचा कलाकार आहे.रंगभूमी मला माणसाला समजून घ्यायला शिकवते,सर्वांशी आदरानी आणि प्रेमानी वागायला शिकवते. रंगभूमी कोणालाच अस्पृश्य समजत नाही आणि मी ही समजत नाही. माझे संस्कार मला माणसांमध्ये भेदाभेद शिकवत नाहीत. मी शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि मला त्याचा अभिमान आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर हि जबाबदारी देणाऱ्या उध्दव साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे आणि प्रेम आहे. आजपर्यंत मी मोहनजी भागवत,शरद पवार साहेब,देवेंद्र फडणवीस साहेब,राज साहेब,रामदासजी आठवले या सर्वांना अतिशय प्रेमानी भेटलो आणि त्यांच्या विषयी माझ्या मनामध्ये आदर आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांना ही त्यांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने(जे माझ काम आहे) मी त्याच आदर आणि प्रेमानी भेटलो.त्यांना भेटून आनंद झाला.त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. ता क आता मुद्दा त्यांच्यावर चरित्रपट करायचा! कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गंमत म्हणून चरित्रपट करायचा विषय काढला. (आणि त्यांचं काम मी करूच शकतो कारण कोणाच्या तरी म्हणण्याप्रमाणे मी भारतरत्न ए. पी.जे.अब्दुल कलाम सर, सेरेना विल्यम्स यांच्या भूमिका करू शकतो तर राहुल गांधींची का नाही?) कळावे लोभ असावा आपला सुबोध भावे @rahulgandhi

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

सुबोध भावेने मजेशीरपणे राहुल गांधींना मी तुमचा बायोपिक करत असल्याचे सांगितले. परंतु, या चित्रपटासाठी नायिका कोण हे अजून ठरलेले नाही. तेव्हा तुम्हीच एखाद्या नायिकेचे नाव सुचवा, असा प्रश्न विचारला होता. यावर राहुल यांनी मी सध्या माझ्या कामातच असल्याचं सांगितलं. त्यावर मी बायोपिकमध्ये तुमच्या नायिकेचे नाव 'वर्क' असे ठेवत असल्याचं सुबोध भावेंने मजेशीरपणे म्हटलं होतं.