अभिनेता सनी देओलने दिल्या 'आत्मपॅम्फ्लेट'ला शुभेच्छा

गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या डार्क कॉमेडी चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Updated: Sep 30, 2023, 04:47 PM IST
अभिनेता सनी देओलने दिल्या 'आत्मपॅम्फ्लेट'ला शुभेच्छा  title=

मुंबई : सध्या प्रेक्षकांमध्ये एकाच चित्रपटाविषयी चर्चा आहे, तो म्हणजे  'आत्मपॅम्फ्लेट'. मुळात या चित्रपटाचे नावच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहे. त्यामुळे परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटासाठी प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही उत्सुक आहेत आणि याला बॉलिवूडचे कलाकारही अपवाद नाहीत. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल यांनीही सोशल मीडियावरून आपला लहानपणीचा फोटो शेअर करत 'आत्मपॅम्फ्लेट'ला शुभेच्छा दिल्या आहेत. 

गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या डार्क कॉमेडी चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ६ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या 'आत्मपॅम्फ्लेट'चे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय, कनुप्रिया ए. अय्यर मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज निर्माते आहेत.

सनी देओल यांनी शेअर केलेल्या स्टेटसमध्ये त्यांनी त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, 'बचपन की यादें हमेशा ही मन को लुभाती हैं ! और ऐसी ही यादों से जुडा 'आत्मपॅम्फ्लेट' लेकर आ रहा है आशिष, असे म्हणत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. यावरूनच बॅालिवूडलाही 'आत्मपॅम्फ्लेट'ची भुरळ पडल्याचे कळतेय.

गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या चित्रपटाचे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय, कनुप्रिया ए. अय्यर मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज निर्माते आहेत.

अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष बेंडे यांनी केले असून परेश मोकाशी यांनी 'आत्मपॅम्फ्लेट'चे लेखन केले आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे हा संपूर्ण चित्रपट परेश मोकाशी कथन करत आहेत. मराठीत अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. मुळात झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी हे आता एक समीकरण झाले आहे. हे दोघे एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी कायमच सर्वोत्कृष्ट कलाकृती सादर करतात. यापूर्वीही झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी यांनी 'एलिझाबेथ एकादशी, चि. व चि. सौ. का. वाळवी असे जबरदस्त चित्रपट दिले. सिनेसृष्टीला नेहमीच वेगळ्या धाटणीचे, विचारांचे चित्रपट देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.