'व्हिस्कीचा ग्लास हातात असला की अप्सरा, नाहीतर...' बायकोच्या प्रश्नावर वैभव मांगलेंचे भन्नाट उत्तर

Vibhav Mangle Funny Video: वैभव मांगले हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांचे व्हिडीओही व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हीही खळखळून हसल्याशिवाय राहणार नाही. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 9, 2023, 06:59 PM IST
'व्हिस्कीचा ग्लास हातात असला की अप्सरा, नाहीतर...' बायकोच्या प्रश्नावर वैभव मांगलेंचे भन्नाट उत्तर title=
actor vaibhav mangle shares a funny video netizens reacts

Vibhav Mangle Funny Video: अभिनेता वैभव मांगले हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहे. त्याच्या अभिनयाचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. सोशल मीडियावरही ते चांगलेच सक्रिय असतात. त्यांचे 'अलबत्या गलबत्या' हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. आजही या नाटकाची क्रेझ कायम आहे. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती, ओटीटी, रिएलिटी शो अशा सर्वच माध्यमांवरती त्यांची मुशाफिरी आहे. सध्या त्यांनी एक गमतीशीर व्हिडीओ हा शेअर केला आहे ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगताना दिसते आहे. यावेळी त्यांनी प्रेक्षकांसोबत हा फनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, “त …..झालं असं”. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला नसेल तर नक्की पाहा कारण हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. यावेळी त्यांनी त्यांच्या चाहत्यांना भरपूर हसवलं आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्या तूफान कमेंट्सही आल्या आहेत. 

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की वैभव मांगले हे टेबलावर बसले आहेत आणि त्यांच्या हातात ग्लास आहे. यात ते म्हणतात की, “हडळ आहे हडळ…लक्षात ठेवा तुम्ही आहात म्हणून हा त्रास सहन होतोय”, असं ते बोलता मग त्यांचे हे बोलणे ऐकून त्यांची पत्नी ऐकते आणि म्हणते, हा मी असं बोलते? त्यावर ते घाबरून वर पाहतात... “ऐरवी बियरचा ग्लास असला की परी, व्हिस्कीचा ग्लास हातात असला की अप्सरा आणि आज काय झालंय हडळ म्हणायला…” असा प्रश्न त्यांच्या पत्नीने विचारला.

हेही वाचा : 'माझे चित्रपट प्रेक्षक पॉर्न म्हणून पाहायचे' अनुराग कश्यप यांच्या चारित्र्यावर उपस्थित झाले होते प्रश्न

त्यावर वैभव मांगलें म्हणाले की, “आज हातात पाण्याचा ग्लास आहे आणि त्यात लिंबू पाणी आहे. सीधी बात, नो बकवास”, असं ते म्हणतात. त्यानंतर त्यांची पत्नी अंगावर पाणी उडवते आणि ते ‘थंडा थंडा कूल कूल’ असे म्हणतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट भरून हसाल. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की त्यांच्या बाजूला एक शोकेस आहे आणि त्यात दारूच्या, बीअरच्या बाटल्या दिसत आहे. या व्हिडीओखाली नेटकरीही भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेक जण त्यांच्या या व्हिडीओवर पोट भरून हसले आहेत. तर एकानं लिहिलंय की, 'मागच्या बाटल्या शोपिस आहेत का?' आणि दुसऱ्या एकानं लिहिलंय की, 'भाऊ घरात राहीचे ना', अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओखाली भारी अशी कमेंटही केली आहे. त्यांनी या आधीही असाच एक गमतीशीर व्हिडीओ टाकला होता.