लग्नाच्या मुहूर्तावर वरूण धवनच्या गाडीला अपघात

अनेक वर्षांच्या रिलेशनशीपनंतर वरून आणि नताशा विवाह बंधनात अडकत आहेत. 

Updated: Jan 24, 2021, 12:01 PM IST
लग्नाच्या मुहूर्तावर वरूण धवनच्या गाडीला अपघात

मुंबई : अभिनेता वरूण धवन लवकरच त्याच्या नव्या आयुष्याची सुरूवात करत आहे. पण त्याआधी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नासाठी जुहूवरुन अलिबागला रवाना होत असताना वरूणच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात वरूणला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. परंतु लग्नाला जाण्याआधी अपघातात झाल्यामुळे धवन आणि दलाल कुटुंबामध्ये चिंतेचं वातावरण होतं.‘टाइम्स ऑफ इंडिया’ वरूणच्या अपघाताची माहिती दिली. या अपघातात त्याच्या गाडीचं किरकोळ नुकसान झालं आहे. मात्र, वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही.

वरून आणि नताशा फार काळापासून एकमेकांना डेट करत आहे. अनेक वर्षांच्या रिलेशनशीपनंतर हे दोघे विवाह बंधनात अडकत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली. आज अखेर ते लग्न करत आहेत.

लग्ना पूर्वीच्या विधिंसाठी धवण आणि दलाल कुटुंब अलिबागला पोहोचले होते. अलीबाग येथील  'द मेंशन हाउस'मध्ये त्यांचा विवाह सोहळा रंगणार आहे. या लग्नसोहळ्यात केवळ ५० जणांनाच आमंत्रण देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या लग्न सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारही उपस्थित राहणार आहेत.