सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! जिल्हा पोलीस अधीक्षकांपाठोपाठ चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या

Beed Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात कारावाईला वेग आला आहे. जिल्हा पोलीसअधीक्षकांपाठोपाठ चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या  करण्यात आल्या आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Jan 5, 2025, 08:51 PM IST
 सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! जिल्हा पोलीस अधीक्षकांपाठोपाठ चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या  title=

Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक आरोप करण्यात आलेत.  त्यानंतर कर्तव्यात कुचराई करणा-या अधिका-यांवर कारवाई सुद्धा करण्यात आली. नवनीत कॉवत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय.  देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कर्तव्यात कुचराई केल्याचा आरोप करत पोलीस दल आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही गावकऱ्यांनी केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांची बदली केली होती. त्यांच्या जागी नवनीत कावत यांची नियुक्ती केली होती. नवनीत कॉवत यांनी पदभार स्वीकारताच बीड पोलीस दलातील चार अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्यात.

सक्तीच्या रजेवर असलेले केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. वैभव पाटील केज पोलीस स्टेशनचे प्रभारी आहेत.  पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब यांची परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आलेय. पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आलेय. 

संतोष देशमुख हत्येनंतर बीडच्या पोलीस प्रशासनावर सातत्यानं अनेक आरोप करण्यात येतायेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगेच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांची बदली केली. त्यांच्या जागेवर नवनीत कॉवत यांची नेमणूक केलीय. कॉवत यांनी रुजू होताच कारवाईला वेग आलाय. तरीही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह होत असताना नवनीत कॉवत यांनी तडकाफडकी चार पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्यात. मात्र, त्यांनी केलेल्या बदलाची सध्या चर्चा सुरु आहे.
चार पोलीस अधिका-यांच्या केलेल्या बदल्यावरून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत बाबत हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय.. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून पोलिसांवर होत असलेल्या आरोप आणि पोलिसांची झालेली मलीन प्रतिमा उंचवता यावी यासाठी पोलीस अधीक्षकांनी कंबर कसल्याचं म्हटलं जातलंय.