मृत्यूपूर्वी अभिनेत्याची पोस्ट, 'चांगली ट्रिटमेंट मिळाली असती तर मी वाचलो असतो.'

अभिनेत्याचा कोरोनामुळे मृत्यू

Updated: May 9, 2021, 03:22 PM IST
मृत्यूपूर्वी अभिनेत्याची पोस्ट, 'चांगली ट्रिटमेंट मिळाली असती तर मी वाचलो असतो.'

मुंबई : बराच काळ कोरोना विरुद्ध लढा दिल्यानंतर अखेर अभिनेता राहुल वोहरा (Rahul Vohra) यांचं निधन झालं आहे. थिएटर दिग्दर्शक आणि नाटक लेखक अरविंद गौहर यांनी फेसबुक पोस्ट करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शनिवारी राहुल वोहरा याने फेसबुकवर निरोप पाठवून लोकांना मदत करण्याचे आवाहन केले. पण या कठीण काळात त्याला मृत्यूवर मात करता आली नाही.

कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) झाल्यापासून राहुल वोहराची तब्येत सातत्याने खराब होत होती. उत्तराखंडचा राहुल हा डिजिटल व्यासपीठावर लोकप्रिय चेहरा होता. नेटफ्लिक्स मालिका फ्रीडममध्ये तो दिसला होता. राहुलचे काम सगळ्यांनाच खूप आवडले आणि चाहत्यांनी त्याचं कौतुक केले. त्याने फेसबुकवर मदतीसाठी पोस्ट केले होते, त्यांनी त्यात लिहिले होते की, 'माझी इच्छा आहे की त्यालाही चांगले उपचार मिळावे.'

Rahul Vohra dies hours after sharing helpless Facebook post seeking better  treatment | मरने से पहले एक्टर ने लिखी फेसबुक पोस्ट, 'अच्छा इलाज मिलता तो  मुझे बचाया जा सकता था' | Hindi

मरण्यापूर्वी अभिनेत्याने फेसबुकवर लिहिले की, 'जर माझ्यावर चांगले उपचार झाले असते तर मी वाचलो असतो.' अभिनेत्याने लिहिले की, 'मी लवकरच जन्म घेईन आणि चांगले काम करेन. आता मी धैर्य गमावले आहे.' 

अरविंद गौहर यांनी राहुल यांच्या निधनाची बातमी आपल्या पोस्टमध्ये शेअर केली आणि शोक व्यक्त केला.