Chennai Super kings Beat Rajasthan Royals : चेपॉकच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्जने तगड्या राजस्थान रॉयल्सला 5 विकेट्सने (CSK vs RR) पराभव केला. चेन्नईसाठी तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंग (Simarjeet Singh) यांनी धारदार गोलंदाजी केली अन् तगड्या राजस्थानला मोठा स्कोर उभारू दिला नाही. चेन्नईकडून कॅप्टन ऋतुराजने 42 धावा केल्या अन् अखेरपर्यंत झुंज दिली. त्यामुळे चेन्नईला विजय मिळवता आला आहे. आता चेन्नईने प्लेऑफच्या (CSK Playoffs Equation) दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तर दुसरीकडे राजस्थानची (Rajasthan Royals) गाडी 16 अंकावरच अडकली आहे.
चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून पराभव केला. राजस्थानने 20 षटकांत 5 बाद 141 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने 18.2 षटकांत 5 विकेट गमावत 145 धावा करत विजयाची नोंद केली. चेन्नईने 18.2 षटकांत 5 विकेट गमावत 145 धावा करत विजयाची नोंद केली. चेन्नईकडून कर्णधार रुतुराज गायकवाडने 41 चेंडूत 42 धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. राजस्थानकडून ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने दोन गडी बाद केले.
संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र या सामन्यात राजस्थानची फलंदाजी खूपच खराब झाली. सिमरजित सिंग आणि तुषार देशपांडे यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावांवर रोखलं. राजस्थानकडून रियान परागने 35 चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. चेन्नईकडून सिमरजीतने तीन, तर तुषारने शेवटच्या षटकात दोन बळी घेतले.
राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचणार नाही?
राजस्थान आजच्या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफचं तिकीट निश्चित करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही राजस्थानने अखेरच्या सामन्यात पराभवाची परंपरा कायम राखली आहे. त्यामुळे आता राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचणार की नाही? असा सवाल विचारला जातोय. राजस्थानने आत्तापर्यंत खेळेलल्या 12 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे एकूण 16 गुण आहेत. मात्र, हे 16 गुण देखील राजस्थानला प्लेऑफमध्ये पोहोचवू शकत नाही. राजस्थानला प्लेऑफ गाठायची असेल तर उर्वरित दोन सामन्यांपैकी कमीतकमी एक सामना जिंकावा लागेल. तर चेन्नई, दिल्ली आणि लखनऊ संघांना किमान एक सामना हरावा लागणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, शुभम दुबे, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.