'या' अभिनेत्रीचे पदार्पण ठरले सुपर फ्लॉप, आता नवऱ्यापेक्षा चारपट आहे श्रीमंत, तुम्ही ओळखलं का?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जिचे पदार्पण फ्लॉप ठरले. पण, नंतर तिने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमवलं आहे. सध्या ती घटस्फोटामुळे चर्चेत आहे.   

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 24, 2024, 02:24 PM IST
'या' अभिनेत्रीचे पदार्पण ठरले सुपर फ्लॉप, आता नवऱ्यापेक्षा चारपट आहे श्रीमंत, तुम्ही ओळखलं का?  title=

बॉलिवूड ही सुप्रसिद्ध अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या नात्याची चर्चा सुरु आहे. अभिनेत्रीने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज ती तिच्या नवऱ्यापेक्षा चारपट श्रीमंत आहे. गेल्या 27 वर्षांहून अधिक काळ ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आहे. ती बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. 

या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या चित्रपटांची अजूनही चाहत्यांमध्ये चर्चा होत असते. या अभिनेत्रीचे नाव आहे ऐश्वर्या राय. 1994 मध्ये मिस वर्ल्डचा ताज जिंकल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या रायने इंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यावेळी तिला आमिर खानच्या 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटाची ऑफर आली होती. मात्र, तिला आधी मॉडेलिंग करायची होती. त्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये प्रवेश केला. 

पदार्पण करणारा चित्रपट ठरला सुपर फ्लॉप

अभिनेत्री ऐश्वर्या रायने 'और प्यार हो गया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिचा हा पहिला चित्रपट फ्लॉप झाला. या चित्रपटामध्ये ती बॉबी देओलसोबत दिसली होती. अभिनेत्रीचा हा चित्रपट फ्लॉप ठरल्यामुळे ऐश्वर्याच्या करिअरमध्ये या चित्रपटाचा काहीच फायदा झाला नाही. अभिनेत्रीचा तामिळ इंडस्ट्रीमध्ये दबदबा असताना तिचे बॉलिवूडमधील चित्रपट फ्लॉप होत होते. त्यानंतर अभिनेत्रीला 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटामधून प्रसिद्धी मिळाली. तिचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. 

नवऱ्यापेक्षा चारपट श्रीमंत 

'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटानंतर अभिनेत्री ऐश्वर्या रायने एकामागून एक हिट चित्रपट दिले. त्यानंतर ऐश्वर्या तिच्या चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून करोडो रुपयांची मालक बनली. अभिनेत्रीची एकूण संपत्ती 862 कोटी रुपये आहे. अभिनेत्री एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी 6-7 कोटी रुपये घेते. त्याचबरोबर तिने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. अभिषेक बच्चनच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं म्हटलं तर तो 280 कोटी रुपयांचा मालक आहे. दोघांच्या नेट वर्थमध्ये जवळपास चारपट फरक आहे.