Pushpa 2 मधील तृप्ती डिमरीचे आयटम साँग रद्द, ऑडिशननंतर तिला नाकारण्यात आले?

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील आयटम साँगची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनसोबत तृप्ती डिमरी या चित्रपटात डान्स करताना दिसणार असल्याची बातमी आली होती. मात्र, आता तृप्ती डिमरीला निर्मात्यांनी नकार दिल्याचे बोलले जात आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 24, 2024, 01:43 PM IST
Pushpa 2 मधील तृप्ती डिमरीचे आयटम साँग रद्द, ऑडिशननंतर तिला नाकारण्यात आले?  title=

Pushpa 2: The Rule : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच खळबळ उडवून दिली होती. चित्रपटातील समंथा प्रभूच्या 'ओ अंतवा मावा..' या आयटम साँगला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. त्यामुळे या हिट आयटम साँगनंतर आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही धमाकेदार आयटम साँगची अपेक्षा प्रेक्षकांना आहे. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या येत होत्या की तृप्ती डिमरी या चित्रपटामध्ये  अल्लू अर्जुनसोबत आयटम साँग करताना दिसणार आहे. तिने या गाण्यासाठी ऑडिशन दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तिला नकार देण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे. 

तृप्ती डिमरी रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल'मध्ये दिसल्यानंतर आता ती अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. सध्या तृप्ती डिमरी राजकुमार रावसोबत 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटात दिसणार आहे.  तृप्तीने 'पुष्पा 2 : द रुल' च्या आयटम साँगसाठी ऑडिशन दिले होते. रिपोर्टनुसार, निर्मात्यांनी तृप्ती डिमरीला नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, नकार देण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या आयटम साँगसाठी तृप्तीसोबत जान्हवी कपूरचे नाव पुढे येत होते. 

समंथा चित्रपटात कॅमिओ करण्याची शक्यता

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक  'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत.  'पुष्पा' हा चित्रपट देखील प्रेक्षकांना खूप आवडला. तसेच या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडली. त्यामुळे  'पुष्पा 2: द रुल'मध्ये प्रेक्षकांची निराशा करायची नसल्यामुळे ते चित्रपटातील गाण्यासाठी योग्य अभिनेत्रीच्या शोधात आहेत. रिपोर्नुसार, या चित्रपटामध्ये समंथा प्रभू कॅमिओ करू शकते असं म्हटलं जात आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

अल्लू अर्जुनने चित्रपटातील त्याची भूमिका एका वेगळ्या पातळीवर नेली आहे. तो हा चित्रपट आकर्षक बनवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर 267.55 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.