अनुष्का विराटच्या आठवणीने व्याकुळ; ट्विट करून म्हटलं....

काय म्हणाली अनुष्का?   

Updated: Feb 18, 2020, 07:31 PM IST
अनुष्का विराटच्या आठवणीने व्याकुळ; ट्विट करून म्हटलं....

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कसोटी मालिकेच्या नेतृत्त्वासाठी पूर्णपणे सज्ज आहे. यावेळी त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील त्याच्यासोबत होती. पण आता ती भारतात परत आली आहे. परंतु ती पती विराटच्या आठवणीत व्यकुळ झाली आहे. विराटपासून दूर होताच तिने सोशल मीडियावर त्याच्या आठवणीत एक भावूक पोस्ट लिहीली आहे. त्याचबरोबर दोघांचा एक फोटो देखील शेअर केला.

दोघांचा सेल्फि फोटो शेअर करत अनुष्काने कॅप्शनमध्ये 'वेळेनुसार निरोप घेणं फार सोप असतं. पण असं कधी होत नाही.' लिहिलं आहे. सध्या अनुष्काची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. लॅकमे फॅशन वीकमुळे (lakme fashion week 2020) अनुष्का भारतात परतली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

You'd think good byes get easier with time. But they never do ...

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

विरूष्काने २०१७ मध्ये लग्न केलं. एका शॅम्पोच्या जाहिरातीच्या शूटींग दरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली. दक्षिण आफ्रिका दौर्‍यादरम्यान त्यांच्यात असलेल्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. 

शिवाय अनेक वेळा त्यांना एकत्र फिरताना देखील स्पॉट करण्यात आलं होतं. याचदरम्यान त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. तेव्हा अनुष्का 'सुल्तान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. पण तेव्हा अभिनेता सलमान खानने दोघांमध्ये समेट केला होता. त्यानंतर त्यांनी लग्न केले.