अभिनेत्री अवनीत कौरवर फसवणुकीचा आरोप, ज्वेलरी ब्रँडने थेट पुरावाच दिला

अवनीत कौर हे मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अवनीत नेहमी चर्चेत असते. पण सध्या अवनीत कौर एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 7, 2024, 05:37 PM IST
अभिनेत्री अवनीत कौरवर फसवणुकीचा आरोप, ज्वेलरी ब्रँडने थेट पुरावाच दिला title=

Avneet Kaur : सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड लुकने नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री अवनीत कौर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी ती हॉट आणि बोल्ड लुकने नाही तर एका फसवणुकीच्या आरोपांमुळे ती चर्चेत आली आहे. 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अवनीत कौरवर एका ज्वेलरी ब्रँडने फसवणुकीचा आरोप केला आहे. या ज्वेलरी ब्रँडने सोशल मीडियावर पुराव्यासह काही पोस्टही शेअर केल्या आहेत. 

अभिनेत्री अवनीत कौर हे मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध नाव बनले आहे. नेहमी हॉट आणि बोल्ड लुकने अवनीत कौर सोशल मीडियावर चर्चेत असते. सतत व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असणारी अवनीत कौर सध्या वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. एका ज्वेलरी ब्रँडने अवनीत कौरवर फसवणुकीचा आरोप केला आहे. 

काय आहेत आरोप? 

ज्वेलरी ब्रँडने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आरोप केले आहेत. सध्या या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. पोस्टनुसार, अभिनेत्रीने तिच्या ब्रँडच्या दागिन्यांची चमक दाखवणारी अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. परंतु अनेक वेळा आश्वासन देऊनही तिने तिच्या ब्रँडला क्रेडिट दिले नाही. यानंतर, जेव्हा ब्रँडने अवनीत कौरला आठवण करून दिली तेव्हा अभिनेत्रीने नकार दिला आणि त्या दागिन्यांचे पैसे देण्याचे मान्य केले. परंतु, अद्याप अवनीत कौरने दागिन्यांचे पैसे दिले नाहीत. असा आरोप ज्वेलरी ब्रँडने केला आहे. 

अभिनेत्री अवनीत कौरने युरोप ट्रिपसाठी आमच्या ब्रँडधून दागिने खरेदी केले होते. अभिनेत्रीच्या स्टायलिस्टशी आमचं बोलणं झालं. आमचे कपडे घालण्याच्या बदल्यात, अवनीतने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये टॅग करण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर 29 जून 2024 रोजी ती आपली वचनबद्धता पूर्ण करेल या आत्मविश्वासाने आम्ही अवनीत कौरला दुहेरी फुलांचे झुमके, ट्विस्टेड लूप हँडकफ ब्रेसलेट आणि लीफ मोटीफ इअररिंगसह 9 वेगवेगळे दागिने पाठवले. 

अवनीत कौरने दागिन्यांना श्रेय दिले नाही

अवनीत कौरने युरोप व्हेकेशनमध्ये सुमारे 7 वेळा आमचे दागिने घातले होते. पण तिने तिच्या पोस्टमध्ये फक्त लक्झरी ब्रँडचा उल्लेख केला होता. त्यानंतर आम्ही तिच्या स्टायलिस्टशी संपर्क साधला. त्यानंतर स्टायलिस्टने सांगितले की, तिने वेगळ्या पोस्टमध्ये आमच्या ब्रँडला दुसऱ्या ड्रेसचे श्रेय देण्याचे मान्य केलं आहे. त्यानंतर देखील अवनीत कौरने पुन्हा पोस्ट केली. मात्र, त्यामध्ये देखील तिने क्रेडिट दिलं नाही. पुन्हा एकदा आम्ही स्टायलिस्टला मेसेज केला. त्यावर अवनीत म्हणाली की, 'अहो, मी त्यांना पैसे देते. किती आहेत ते'.  आम्ही असे स्पष्टीकरण दिले की, हे पैशांबद्दल नाही, तर जे ठरले होते त्यावर ठाम राहण्याबद्दल आणि आम्ही अवनीतसाठी दागिन्यांची ऑर्डर दिली होती.