ब्रेक-अप होताच पुन्हा प्रेमात पडली अनन्या पांडे; हार्दिक नव्हे, मॉडेलला करतेय डेट!

Ananya Panday is in Relationship Not With Hardik Pandya but With A Model : ब्रेकअपनंतर अनन्या पांडे पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये हार्दिक पांड्या नाही तर याच्यासोबत आहे रिलेशनशिपमध्ये! 

दिक्षा पाटील | Updated: Aug 7, 2024, 05:05 PM IST
ब्रेक-अप होताच पुन्हा प्रेमात पडली अनन्या पांडे; हार्दिक नव्हे, मॉडेलला करतेय डेट! title=
(Photo Credit : Social Media)

Ananya Panday is in Relationship Not With Hardik Pandya but With A Model : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र, तिचं चर्चेत असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कोणतं असेल तर ते तिचं खासगी आयुष्य आहे. तिच्या कामापेक्षा तिचं खासगी आयुष्य हे जास्त चर्चेत असतं. गेल्या काही दिवसांपूर्वी अनन्या पांडेचं नाव हे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी जोडण्यात आलं होतं. मात्र, आता तिचं नाव कोणत्या दिसऱ्या कलाकाराशी जोडण्यात येत आहे. आता हा कोण आहे याविषयी जाणून घेऊया...

अनन्याविषयी अशी चर्चा आहे की तिच्या आयुष्यात आता एका नव्या व्यक्तीनं एन्ट्री केली आहे. आता हा कोण आहे असा तुम्हाला प्रश्न असेल तर तो आदित्य रॉय कपूर किंवा हार्दिक पांड्या नाही तर फॉर्मर मॉडेल Wlaker Blanco आहे. अशी चर्चा आहे की अनन्या ही वॉकर ब्लॅंकोसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नातील अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यापैकी एका व्हिडीओत अनन्या पांडे ही एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत होती. त्या मिस्ट्री मॅननं अनन्याला जवळू पकडल्याचे दिसत होते. इंटरनेटवक व्हायरल होत असलेला हा फोटो अनन्या ही हसताना दिसली. तर अनन्यासोबत तो स्टेजवर असून तिथे नाचताना दिसला. रिपोर्ट्सनुसार, अनन्या आणि वॉकर ब्लैंको यांची मुलाखत ही अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग पार्टीत झाली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या भेटीतच दोघांमध्ये स्पेशल कनेक्शन झालं. 

दोघं सध्या एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आहे. वॉकर ब्लॅंकोविषयी बोलायचे झाले तर तो अंबानींच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. तो जामनगरमध्ये राहतो. वॉकर वंतारा अॅनिमल पार्कमध्ये अंबानी कुटुंबासाठी काम करतो. 

हेही वाचा : Elvish Yadav समलैंगिक? बेडरुम व्हिडीओ होतोय व्हायरल, फॅन्स म्हणतात- यात वाईट काय?

त्यामुळे ब्रेकअपनंतर अनन्याला पुन्हा एकदा प्रेम मिळाल्याची चर्चा रंगली आहे. अशात आता नक्की त्या दोघांचं नातं पुढे किती जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अनन्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच CTRL मध्ये दिसणार आहे. त्याशिवाय अनन्या पांडेकडे Shankara हा चित्रपट देखील आहे. ज्याची शूटिंग आता सुरु आहे.