close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रियकराला कंटाळून अभिनेत्रीची आत्महत्या

तामिळ अभिनेत्री याशिकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. चेन्नईतील पारावलूरमधील जीकेएम कॉलनीमध्ये राहत्या घरात बुधवारी याशिका मृत अवस्थेत आढळून आली

Updated: Feb 16, 2019, 05:57 PM IST
प्रियकराला कंटाळून अभिनेत्रीची आत्महत्या

मुंबई : तामिळ अभिनेत्री याशिकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. चेन्नईतील पारावलूरमधील जीकेएम कॉलनीमध्ये राहत्या घरात बुधवारी याशिका मृत अवस्थेत आढळून आली. २१ वर्षीय अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर अनेक भूमिका साकारल्या होत्या. त्याचप्रमाणे तामिळ सिनेमा 'मन्नर वागययारा' मध्ये एक भूमिका साकारत चाहत्यांची मने जिंकली होती. याशिका ही तिच्या प्रियकरासोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. अरविंद अलियास मोहन बाबू असे तिच्या प्रियकराचे नाव आहे.

हॉस्टेल मध्ये एकत्र राहत असताना त्यांची ओळख झाली आणि कालांतराने ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मोहन एका सेलफोनच्या दुकानात कामाला होता. मागील चार वर्षे हे दोघे एकत्र राहत होते. काही कारणांमुळे दोघांमध्ये वाद सुरु होता. त्यानंतर मोहन घर सोडून निघून गेल्याचे समोर येत आहे. 

भांडण झाल्यामूळे अभिनेत्रीने पंख्याला लटकून फाशी घेतली. पोलिसांनी योशिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला आहे. आत्महत्या करण्याआधी अभिनेत्रीने आपल्या आईसोबत व्हाट्सअॅपवर संवाद साधला होता. आईसोबत झालेल्या संवादात, 'तो लग्न न करताच निघून गेला, माझ्या मृत्यू नंतर तू त्याला शिक्षा दे.' असे तिने म्हंटले आहे. सध्या पोलिसांनी मोहनवर आरोप दाखल करत त्याचा शोध घेत आहेत.