Pulwama Attack: हल्ल्याच्या निषेधार्थ कलाविश्वात 'ब्लॅक डे'

दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ १७ फेब्रुवारी रोजी बॉलिवूडमध्ये 'ब्लॅक डे' पाळण्यात येणार आहे.

Updated: Feb 16, 2019, 05:06 PM IST
Pulwama Attack: हल्ल्याच्या निषेधार्थ कलाविश्वात 'ब्लॅक डे' title=

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या या हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण पसरले आहे. बॉलिवूडमधूनही हल्ल्याचा निषेध होत असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी बॉलिवूडमधून जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'ब्लॅक डे' पाळण्यात येणार आहे. 

पुलवामा हमला: अमेरिका ने की निंदा, पाकिस्तान के दोस्त चीन ने साधी चुप्पी

'बॉलिवूड लाइफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्पलॉइज'ने (एफडब्लूआयसीई) बॉलिवूड १७ फेब्रुवारी रोजी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार असून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत 'ब्लॅक डे' पाळला जाणार आहे. रविवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ दरम्यान कोणतेही काम केले जाणार नाही. या वेळेत प्रार्थना सभाही घेण्यात येणार आहे. 'एफडब्लूआयसीई'चे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी याबाबत माहिती दिली. स्टूडिओ, एडिट टेबल, शूटिंग स्थळांवर २ ते ४ या वेळेत कोणतेही काम केले जाणार नाही. हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड गोरेगावमधील फिल्म सिटीबाहेर जमणार आहे. 

पुलवामा आतंकी हमला : 10 किमी दूर तक सुनाई दिया धमाका, खौफनाक मंजर देख जम गया खून

१४ फेब्रुवारी रोजी दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'कडून करण्यात आला. 'जैश ए मोहम्मद'चा सदस्य असणाऱ्या २२ वर्षिय आदिल दारने सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला घडवून आणला. आरडीएक्ससारख्या स्फोटकांनी भरलेल्या कारची जवानांच्या बसला धडक देण्यात आली. या हल्ल्यात ४०हून अधिक जवान शहीद झाले. अनेक जण जखमी झाले असून अनेकांची स्थिती नाजूक आहे. सुरक्षादलावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे.