जान्हवी कपूरचं मेकअप आर्टिस्टसोबत मोठं भांडण

जान्हवी तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत भांडताना दिसली

Updated: Nov 28, 2021, 12:47 PM IST
 जान्हवी कपूरचं मेकअप आर्टिस्टसोबत मोठं भांडण

मुंबई : जान्हवी कपूरची मस्ती सगळ्यांनाच माहिती आहे. ती दररोज इन्स्टाग्रामवर तिच्या मित्रांसोबत मजेशीर व्हिडिओ शेअर करत असते. मात्र यावेळी जान्हवी तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत भांडताना दिसली. असाच एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे, ज्यामध्ये जान्हवी आणि तिच्या मेकअप आर्टिस्टमध्ये जोरदार वादावादी होत आहे. 

जान्हवीचा हा व्हिडिओ खोट-खोटं सुरु असलेलं शाब्दिक भांडण आहे. बिग बॉस 5 मध्ये तिने तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत शोच्या स्पर्धक पूजा मिश्रा आणि सोनाली नागराणी यांच्या वादावर संवाद साधला आहे. 'पूजा ही काय वागणूक आहे?' हा डायलॉग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

याची जान्हवीने कॉपी केली आहे. ज्यामध्ये तिच्या मेकअप आर्टिस्टमध्ये शब्दयुद्ध सुरू आहे. या फेक फाइटमध्ये जान्हवी तिच्या मेकअप आर्टिस्टवर बोट दाखवताना दिसली. एकूणच जान्हवीने पूजाची हुबेहूब कॉपी केली आहे.

जान्हवीच्या व्हिडिओवर अर्जुनची प्रतिक्रिया

हा मजेदार व्हिडिओ शेअर करत जान्हवीने 'तुला काय वाटते मला मदत हवी आहे' असे कॅप्शन दिले आहे. आता जान्हवीचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजले असेल की, ती एकटीच पुरेशी आहे. जान्हवीचा भाऊ अर्जुन कपूरने बहिणीची खिल्ली उडवली आणि सायलेंट इमोजीसह 'हो' लिहिले. हा व्हिडिओ जान्हवीच्या मित्रांना आणि चाहत्यांना खूप आवडतोय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा जान्हवीचा आगामी सिनेमा

वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, जान्हवी कपूरने नुकतेच तिच्या आगामी 'मिली' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. जान्हवीचे वडील बोनी कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. याशिवाय जान्हवीच्या आगामी चित्रपटांमध्ये गुड लक जेरी, मिस्टर अँड मिसेस माही आणि दोस्ताना 2 यांचा समावेश आहे.